8 दिवसात 2 टिकटॉक स्टार्सचा झाला संशयास्पद मृत्यू; गूढ अद्याप कायमच

8 दिवसात 2 टिकटॉक स्टार्सचा झाला संशयास्पद मृत्यू; गूढ अद्याप कायमच

टिकटॉकवर मोठ्या संख्येने तरुण तरुणी आपले व्हिडीओ शेअर करुन प्रसिद्ध झाले आहेत

  • Share this:

मुंबई, 29 जून : केंद्र सरकारने 59 चिनी Apps बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉक स्टार सिया कक्कर टोकाचं पाऊल उचलत बुधवारी आयुष्य संपवलं. त्यानंतर आज सोनीपत जिल्ह्यातील कुंडली परिसरात एका टिक-टॉक स्टारची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवानी खोबियान असं या स्टारचं नाव आहे.

या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्वास खळबळ उडाली. एकाच आठवड्यात या दोन टिकटॉक स्टारच्या आत्महत्येची वृत्त समोर आल्याने अनेक संशय व्यक्त केला जात आहे. 26 जून रोजी सिया कक्करच्या आत्महत्येचं वृत्त समोर आलं होतं.  पोलिसांना सियाच्या खोलीतून काही महत्त्वपूर्ण कागदपत्र, लॅपटॉप ताब्यात घेतला आहेत. तर सियाचं पार्थिव शवविच्छेदन अहवालानंतर कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सियाला काही दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांमुळे सियानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सियानं अगदी कमी वयात 16 वर्षी सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळवली होती. टिकटॉकवर लाखो तर इन्स्टाग्रामवर 98 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे काही फॅनपेज देखील बनवण्यात आले आहेत.सियानं आत्महत्या केल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सियाच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिला धमक्या आल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

तर दुसरीकडे आज हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनीपत जिल्ह्यातील कुंडली परिसरात एका टिक-टॉक स्टारची गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवानी खोबियान असं या स्टारचं नाव आहे. शिवानीचा मृतदेह सलूनमधील बॉक्स बेडमध्ये आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मृत शिवानी बहीण आणि मित्राने बेड उघडला असता त्यात मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, कुंडली येथे शिवानी ही 'टच एंड फेअर' नावाचं सलून चालवत होती. टिक-टॉकवर तिचे 1 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. शिवानीच्या हत्याचा आरोप कुंडली येथील आरिफ नामक तरुणावर ठेवण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.  शिवानीचा मृतदेह सलूनमध्ये ठेवलेल्या बॉक्स पलंगमध्ये ठेवून आरोपी फरार झाला आहे.

हे वाचा-सौंदर्यात अभिनेत्रींशी बरोबरी करणाऱ्या या TikTok स्टार्सना म्हणावं लागेल अलविदाशिवानीची बहीण श्वेता हिने सांगितलं की, 26 जूनला आरिफ हा शिवानीला भेटालयला तिच्या ब्यूटी पार्लरमध्ये आला होता.  श्वेतानं फोन केल्यानंतर शिवानीनं तिला आरिफबाबत सांगितलं होतं. त्या रात्री शिवानी घरी आलीच नाही. रात्री श्वेताने तिला मेसेज केला होता. मी हरिद्वारला आली असून मंगळवारी घरी परतेल असा,  शिवानीने तिला रिप्लाय दिला होता.

First published: June 29, 2020, 11:22 PM IST
Tags: tiktok

ताज्या बातम्या