जयपूर, 28 नोव्हेंबर: लाचखोरी केल्याप्रकरणी निलंबित झालेली इन्स्पेक्टर सीमा जाखड (suspended inspector seema jakhad marriage video goes viral) विवाहबंधनात अडकत आहे. रविवारी सीमाचं लग्न असून शनिवारी झालेल्या मेहंदी समारंभातील डान्सचा (Corrupt inspector marriage photos) व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या वादग्रस्त आणि भ्रष्ट कारकिर्दीसाठी कुप्रसिद्ध असलेली सीमा जाखड हे एकेकाळी धडाडीची अधिकारी म्हणून प्रसिद्ध होती. मात्र लाचखोरीची वृत्ती अंगलट येऊन तिला कारवाई सहन करावी लागली होती.
राजस्थानमध्ये शुभमंगल
जोधपूरच्या मंडोरमध्ये सीमाचा शानदार विवाहसोहळा पार पडत आहे. शनिवारी नातेवाईकांच्या उपस्थितीत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला. यावेळी सीमाने तिच्या नातेवाईकांसह सासरच्या मंडळींसोबत आनंद लुटल्याचं या व्हिडिओतून दिसतं. भोपाळगडच्या सुखराम कालीराणा यांच्याशी सीमाचा विवाह होत असून ते एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओत सीमा डान्स फ्लोअरवर ठेका धरताना दिसत असून तिने पारंपरिक राजस्थानी ड्रेस परिधान केला आहे.
पटवारी, बाबू, बीडीओ रिश्वत मामलों में तत्काल धरे जाते हैं... और ये तस्करों से सांठ-गांठ और रिश्वत मामले में बर्खास्त पुलिस इंस्पेक्टर #सीमा_जाखड़ जश्न मना रही है!?@PoliceRajasthan @SirohiPolice @Bollywoodtrack_ @jodhpur_police #rajasthan pic.twitter.com/loiDay6gZC
— Sambrat Chaturvedi | Rajasthan (@samjpr) November 28, 2021
अटक का नाही?
जेव्हा इतर अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात पकडलं जातं, तेव्हा त्यांना तत्काळ अटक केली जाते. मात्र सीमा पटवारी स्वतःच्या लग्नात ठेका धरून आनंद साजरा करत असल्यामुळे अनेकांनी यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजकीय संबंधांमुळे सीमाला वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
वादग्रस्त कारकीर्द
अंमली पदार्थ तस्करांकडून 10 लाखांची लाच सीमा जाखडनं स्विकारल्याचं सिद्ध झालं होतं. लग्नाच्या दोनच दिवस अगोदर सीमावर कारवाई करत तिला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.
हे वाचा - 89 वर्षांत कुणालाही जमलं नाही ते श्रेयसनं केलं, 'हा' रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय
लेडी सिंघम बनण्याची हौस
सीमा जाखड ही नेहमीच लेडी सिंघम बनण्याची इच्छा बाळगून होती, असं सांगितलं जातं. मात्र लोभीपणा आणि लाचखोरी या गुणांमुळे तिच्या अंगी असलेल्या धडाडीचं कधीच चीज होऊ शकलं नाही, याची अनेकांना खंत वाटते. तिच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांनी आक्षेप व्यक्त केले असून अशा अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची मान खाली जात असल्याचीही चर्चा पोलिसांमध्ये आहे. उंची शौक, महागड्या वस्तूंची हौस आणि मिरवण्याची वृत्ती यापायी चांगले अधिकारी होण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीदेखील कशा स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ शकतात, याचं उदाहरण म्हणजे सीमा असल्याचं सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Photo viral