भारतातलंच आहे हे दृश्य! PPE किटमुळे झालं होतं निलंबन, सरकारचा विरोध करताच पोलिसांनी हात बांधून नेलं

भारतातलंच आहे हे दृश्य! PPE किटमुळे झालं होतं निलंबन, सरकारचा विरोध करताच पोलिसांनी हात बांधून नेलं

कोरोना ग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने पीपीई किट आणि एन 95 मास्कची मागणी केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

  • Share this:

विशाखापट्टणम, 17 मे : आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं सरकारविरोधात कपडे काढून आंदोलन करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी हात बांधून पोलीस ठाण्यात नेलं. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. नर्सिपटनम इथं सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारावेळी डॉक्टरांनी सरकारकडे पीपीई कीट आणि एन 95 मास्कची मागणी केली होती. याबाबत डॉक्टर सुधार यांनी माध्यमांनासुद्धा माहिती दिली होती.

माध्यमांना माहिती दिल्यानंतर डॉक्टर सुधाकर यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आले. त्यानंतर सुधाकर यांचे मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

सुधाकर यांनी शनिवारी त्यांची कार अचानक रस्त्याकडेला लावली आणि शर्ट काढला. त्यानंतर उघड्या शरीरासह त्यांनी रस्त्याच्या मधोमध झोपून विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात वक्तव्य केले.

घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर सुधाकर यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी त्यांचे हात बाधून रिक्षात बसवून पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. त्यांची कार जप्त करण्यात आली असून सुधाकर हे नशेत होते असंही म्हटलं जात आहे.

हे वाचा : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशातलं हे मोठ राज्य हादरलं, लाखो मजूर परतले

दरम्यान, सध्या कोरोनाच्या काळात देवदूत ठरलेले डॉक्टर आणि लोकांचे संरक्षण करणारे पोलीस यांच्या या कृत्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. डॉक्टरांनी विरोधासाठी अवलंबलेला मार्ग आणि त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांनी दिलेली वागणूक कोड्यात टाकणारी आहे.

हे वाचा : पोलिसांना पाहून मास्क नसलेल्या तरुणाने तोंडावर लावली दहाची नोट

डॉक्टरांचा विरोध आणि पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मंत्री देवीननी उमा यांनी म्हटलं की, इतक्या मोठ्या शहरातील सरकारी रुग्णालयाती वरिष्ठ डॉक्टरांनी आवश्यक साधनांची मागणी केली तेव्हा त्यांचे निलंबन केले. ते रस्त्यावर विरोध करण्यासाठी उतरले तेव्हा सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांचे हात बांधून नेलं. एका वरिष्ठ डॉक्टरसोबत असं वर्तन दुर्दैवी आहे.

हे वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

First published: May 17, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या