Home /News /national /

नव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर

नव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर

नियमावलीप्रमाणे यातील 490 नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

    अनिल पाटील, प्रतिनिधी गोवा, 29 डिसेंबर : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus Strain) सापडल्यामुळे जगभरात काळजी घेतली जात आहे. आता भारतातही नव्या कोरोना विषाणूचे 6 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 37 वर पोहोचली आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या  कोविड-19 व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धसका साऱ्या जगाने घेतला आहे. त्यामुळे इंग्लंड मधून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. गोव्यात 9 डिसेंबर 20 डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमधील आता 37 प्रवाशी पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यात रोज नव्याने भर पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव, 37 उमेदवारांसह 13 कर्मचारी पॉझिटिव्ह या दरम्यानच्या काळात ब्रिटनवरून  979  प्रवासी भारतात आले होते. नव्या  नियमावलीप्रमाणे यातील 490 नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी  37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. इतरांच्या चाचण्या घेणे सुरू आहे. या सर्व 37 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने स्पेशल कोविड रुग्णालयात ठेवला असून त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून यांना रुग्णांचे  विलगीकरण केलं असून  नवे रुग्ण सापडल्यास त्यांना स्वतंत्र उपचार देण्यासाठी दोन्ही जिल्हा रुग्णालयात पन्नास पन्नास खाटांचे वेगळे नवे वार्ड उभारण्यात आले आहेत. भारतात नव्या कोरोनाची एंट्री भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. राजकारण तापलं! शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या