तृणमूलच्या खासदाराच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संदिग्ध मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

तृणमूलच्या खासदाराच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संदिग्ध मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगवाणारे देवाशीष आचार्य (Devashish Acharya) या तरुणाचा संदिग्ध मृत्यू (Suspected death) झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

कोलकाता, 18 जून: एका कार्यक्रमादरम्यान 2015 साली एका व्यक्तीनं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Nephew Abhishek Banerjee) यांच्या कानशिलात लगावली होती. अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगवाणारे देवाशीष आचार्य (Devashish Acharya) या तरुणाचा संदिग्ध मृत्यू (Suspected death) झाला आहे. काही अज्ञात लोकांनी देवाशीष यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर काही तासांतच देवाशीष यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी देवाशीष यांची हत्या (Claim as murder) झाली असल्याचा आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी मृत देवाशीष आचार्य आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवर बाहेर गेले होते. दरम्यान सोनापेट्या टोल प्लाझानजीक असणाऱ्या एका चहाच्या दुकानाजवळ सर्वजण थांबले. याठिकाणी चहा पिल्यानंतर देवाशीष अचानक निघून गेले. यानंतर ते थेट दुसऱ्या दिवशीच गंभीर अवस्थेत सापडले आहेत. काहीजणांनी त्यांना मिदनापुरातील तमलुक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

या घटनेची माहिती मिळताच देवाशीष यांच्या कुटुंबीयांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली. पण पुढील काही तासांतच देवाशीष यांची प्राणज्योत मालवली आहे. यानंतर कुटुंबीयांनी देवाशीष यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा-सहलीला गेलेलं पुण्यातील कुटुंब संपलं; मायलेकरानंतर नदीपात्रात आढळला पतीचा मृतदेह

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देवाशीषच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. देवाशीषनं 2020 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कोणताही खुलासा झाला नाही. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. तसेच विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही सापडतंय का याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 3:22 PM IST

ताज्या बातम्या