Home /News /national /

एअरपोर्टवर बाँब ठेवणारा 'तो' इंजिनीअर आणि MBA; नोकरी न दिल्याचा होता राग

एअरपोर्टवर बाँब ठेवणारा 'तो' इंजिनीअर आणि MBA; नोकरी न दिल्याचा होता राग

मंगळुरू विमानतळाच्या तिकीट काउंटरवर सोमवारी एक बेवारस बॅग सापडली होती. त्यात IED सापडल्याने खळबळ उडाली होती. हा बाँब ठेवणारा संशयित इंजिनीअर आणि मॅनेजमेंट ग्रॅज्युएट असल्याचं उघड झालं आहे.

    मेंगळुरू, 22 जानेवारी : कर्नाटकातल्या मंगळुरू विमानतळाजवळ दोन दिवसांपूर्वी बाँब ठेवल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. हा बाँब ठेवणारा संशयिताने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. या संशयिताचं नाव आदित्य राव असल्याचं सांगितलं जात आहे. उडुपीच्या मणिपाल इथला रहिवासी असलेला आदित्य राव इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट आहे. त्याने MBA सुद्धा केलेलं आहे. सध्या तो बेरोजगार होता. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर एअरपोर्टवर नोकरी मिळाली नाही. त्याचा राग मनात होता. बेरोजगारीवर कंटाळून बदला घेण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याची कबुली त्याने दिली. पोलीस या प्रकरणी आणखी तपास आणि चौकशी करत आहेत. आदित्य राव हा 36 वर्षांचा तरुण बेंगळुरूच्या पोलीस मुख्यालयात दाखल झाला. बंगळुरू एअरपोर्टवर सिक्युरिटी गार्डसाठी नोकरीचा अर्ज त्याने केला होता. पण नोकरीसाठी आवश्यक कागदपत्र तो देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला नोकरी नाकारण्यात आली. या गोष्टीचा राग मनात ठेवून आदित्यने बाँब ठेवण्याची कृती केलीय बाँबसाठी स्फोटकं आली कुठून? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य रावने यापूर्वीसुद्धा एअरपोर्टवर बाँब ठेवल्याचा खोटा फोन केला होता. 30 ऑगस्ट 2018 रोजी विमानात बाँब असल्याचा फोन करून त्यानं पोलिसांची झोप उडवली होती. पण आता त्याला मेंगळुरू एअरपोर्टवर बाँब ठेवण्यासाठी त्याने तो आणला कुठून. स्फोटकं किंवा IED त्याला कुणी पुरवली या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. आदित्य राव याने यापूर्वी लॅपटॉप चोरल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाल्ली आहे, अशीही माहिती समोर आली आहे. मंगळुरू विमानतळाच्या तिकीट काउंटरवर सोमवारी एक बेवारस बॅग सापडली होती. बाँबशोधक पथकाला या बॅगेत IED सापडलं. विमानतळावर स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. वेळीच खबरदारी घेत बाँब निकामी करण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली. अन्य बातम्या CM उद्धव ठाकरेंचं पुन्हा 'जय श्रीराम', खासदारांना घेऊन धडकणार अयोध्येत इनकम टॅक्समध्ये होऊ शकतो मोठा बदल! मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी सावधान! फुटपाथवर विकणाऱ्या चहा-कॉफीमध्ये मिसळला जातोय गांजा
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Bomb, Karnataka

    पुढील बातम्या