Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर व्हायरल झाला हा VIDEO, लोक म्हणाले...

सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळ्या सोशल साईट्सवर हा व्हि़डिओ झळकत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 06:18 PM IST

Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर व्हायरल झाला हा VIDEO, लोक म्हणाले...

मुंबई, 07 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी निधन झालं. सुषमा स्वराज(Sushma Swaraj)यांच्या निधनावर सोशल मीडियावर(Social Media)शोककळा व्यक्त होत आहे. देशा-विदेशातून लोकांनी त्यांच्या जाणाऱ्यावर शोक व्यक्त केला आहे. या सगळ्यात सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळ्या सोशल साईट्सवर हा व्हि़डिओ झळकत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुषमा स्वराज या कलम 370वरून विरोधकांना धर्मनिरपेक्षतेवर चांगलंच सुनावतात. आपल्या आक्रमक अंदाजात या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की, 'जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द झालाच पाहिजे'

सुषमा स्वराज पुढे म्हणतात की, 'हिंसाचारामध्ये सहभागी होणारे पक्ष हे धर्मनिरपेक्ष आहेत. खरंतर आम्हाला आम्ही हिंदू असल्याचा गर्व आहे. त्यामुळे आम्ही सांप्रदायिक आहोत. तोपर्यंत आम्हाला हिंदू असल्याची लाज वाटत नाही तोपर्यंत आम्ही या धर्मनिरपेक्ष पक्षांसारखे नाही होणार.' देशात अनेक पक्ष असे आहेत जे हिंदूंना शिव्या देऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात. हाच त्यांचा धर्मनिरपेक्षपणा आहे असंही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या - महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

खरंतर सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या दिवशी जम्मू काश्मीरला अंशत: कलम 370 रद्द झाला. त्यावेळी त्यांनी ट्वीट करत 'मी याच दिवसाची वाट पाहत होते' असं त्या म्हणाल्या. त्यामुळे त्यांच्या भाषणाचा हा व्हिड़िओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या - आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह

'माँ कैसे चली गई'

या व्हिडिओला शेअर कर 'माँ कैसे चली गई' अशी प्रतिक्रिया लोकांनी केली आहे. सुषमा यांच्या जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे. मुळात त्या आता या जगात नाही यावर कोणालाच विश्वास बसत नाही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...