आयसिसने 39 भारतीयांची हत्या करून एकाच कबरीत पुरले-सुषमा स्वराज

आयसिसने 39 भारतीयांची हत्या करून एकाच कबरीत पुरले-सुषमा स्वराज

यातील 39 जणांची आयसिसने हत्या करून त्यांना एकाच कबरीत पुरले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली आहे.

  • Share this:

20 मार्च: साधारण तीन वर्षांंपूर्वी आयसिसने  इराकच्या मोसूल शहरातून 40  भारतीयांचं अपहरण केलं होतं. यातील 39 जणांची आयसिसने हत्या करून त्यांना एकाच कबरीत पुरले  असल्याची माहिती परराष्ट्र  मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली आहे.

3 साडेतीन  वर्षांपूर्वी आयसिसने इराक  आणि  सिरीया या दोन देशातील अनेक शहरं ताब्यात घेतली होती. तेव्हा तेथील 40  अनिवासी भारतीयांचे अपहरण करण्यात आलं होतं. त्यातल्या एकाने आपण बाँग्लादेशी मुसलमान असल्याचं सांगून स्वत:ची सुटका करून घेतली होती. उरलेल्या 39 जणांचं काय  झालं याबद्दल काही माहिती मिळाली नव्हती. आता मात्र परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार या 39 भारतीयांचा कसून शोध घेण्यात आला. या 39 जणांना मोसूलहून आयसिसचे जवान बदूश शहरात घेऊन गेले. बदूशमध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. नंतर या सर्वांना एकाच कबरीत पुरले गेले. या कबरीचा  शोध लागला असून या 39 भारतीयांचे अवशेष मिळाले आहेत. हे लवकरच भारतात आणले जाणार आहेत. त्यातल्या 38 जणांची ओळखही पटली आहे.

हे सगळे बिहार ,हिमाचल आणि पंजाब या राज्यांचे निवासी होते. गेले तीन वर्ष सरकार हे सगळे जिवंत असल्याची माहिती देत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 03:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading