कुलभूषण यांच्या पत्नी-आईला विधवेसारखं वागवलं, सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

कुलभूषण यांच्या पत्नी-आईला विधवेसारखं वागवलं, सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

परराष्ट्र मंत्री म्हणाल्या, ' पाककडून भेटींबद्दलच्या अटींचं उल्लंघन करण्यात आलंय.'

  • Share this:

28 डिसेंबर : कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना पाकिस्ताननं वाईट वागणूक दिल्यावरून काल लोकसभेत काही वेळ गोंधळ झाला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यावर निवेदन सादर केलं. त्या म्हणाल्या, ' पाकिस्ताननं फक्त पत्नी नव्हे तर कुलभूषण यांच्या आईचंही मंगळसूत्र उतरवलं. दोघीही कुलभूषण यांना भेटायला गेल्या, तेव्हा आईच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्यानं त्यांनी वडिलांची चौकशी केली.' पाकिस्तानाच्या या वर्तनाचा त्यांनी निषेध केला.

परराष्ट्र मंत्री म्हणाल्या, ' पाककडून भेटींबद्दलच्या अटींचं उल्लंघन करण्यात आलंय. मीडियाला कुटुंबापासून लांब ठेवण्याबाबत एकमत झालं होतं. तरीही पाकिस्तानी मीडियाला त्यांच्या जवळ जाऊ देण्यात आलं.'

त्या म्हणाल्या, 'जाधव यांच्या आईला सलवार कुर्ता घालायला भाग पाडण्यात आलं. मराठीमध्ये बोलण्यास मनाई करण्यात आली. मराठीमध्ये बोलल्यानंतर इंटरकॉम बंद करण्यात आलं.पत्नीचे बूटही परत दिले नाहीत.' पाकनं एका आईच्या भावनेशी खेळ खेळल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.

कुलभूषण यादव तणावात असल्याचं, कुलभूषण यांच्या आईंनी सांगितलं, असंही त्यांनी म्हटलं. पाकिस्तान खोडसाळपणा करत असल्याचा सुषमा स्वराज यांनी आरोप केला. या भेटीचा पाकिस्ताननं प्रोपोगंडासाठी उपयोग केला, असंही त्या म्हणाल्या.कुलभूषण यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला पाठिंबा दर्शवलाय.

First Published: Dec 28, 2017 11:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading