...जेव्हा सुषमा स्वराजच करतात काँग्रेसचं ट्विट रिट्विट

...जेव्हा सुषमा स्वराजच करतात काँग्रेसचं ट्विट रिट्विट

तर झालं असं की आयसीसमध्ये 39 भारतीयांचं मोसूलमधून अपहरण झालं होतं. त्यानंतर गेल्या तीन वर्षात त्यांचं काय झालं , त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे याबाबत कुठलीच माहिती सरकारने दिली नाही. पण आतामात्र त्या 39 भारतीयांची हत्या झाल्याचं सुषमा स्वराजने संसदेच्या पटलावर सांगितलं.

  • Share this:

27 मार्च:    भाजपच्या निर्णयाविरोधात अनेक पोल काँग्रेस घेत असते. असाच एक पोल काँग्रेसने सुषमा स्वराजांविरूद्ध  घेतला.   पण गंमत म्हणजे या पोलमध्ये सुषमा स्वराजांच्या बाजूनेच मतदान झालं आणि अखेर  तो पोल सुषमा स्वराजांनी स्वत:च रिट्विट केला.

तर झालं असं की आयसीसमध्ये  39 भारतीयांचं मोसूलमधून अपहरण  झालं होतं. त्यानंतर गेल्या तीन वर्षात त्यांचं काय झालं , त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे याबाबत कुठलीच माहिती सरकारने दिली नाही. पण   आतामात्र त्या 39 भारतीयांची हत्या झाल्याचं सुषमा स्वराजने संसदेच्या पटलावर सांगितलं.  ही बातमी मृतांच्या कुटुंबियांना आधी देण्यात आली नाही म्हणून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता यानंतर काँग्रेसने ट्विटरवर एक पोल चालू केला. ज्यात मोसूलमध्ये भारतीयांचा मृत्यू ही सुषमा स्वराजचं सगळ्यात मोठं अपयश आहे का असं विचारण्यात आलं होतं. हा पोल काँग्रेसच्या बाजूने येण्याऐवजी काँग्रेसच्या विरोधात गेला. 76 टक्के लोकांनी काँग्रेसच्या विरोधात आणि सुषमा स्वराजच्या बाजूने मतदान केलं.  यामुळे अखेर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीच हा पोल शेअर केला. या पोलवर काँग्रेसविरोधी ट्विट्स पण पडले .यात काँग्रेसने स्वत:चेच हसं करून घेतलं.

Do you think the death of 39 Indians in Iraq is Sushma Swaraj’s biggest failure as Foreign Minister? #IndiaSpeaks

— Congress (@INCIndia) March 26, 2018

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 06:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading