या कारणांसाठी सुषमा स्वराज यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये!

या कारणांसाठी सुषमा स्वराज यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये!

सुषमा स्वराज यांनी कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. त्यामुळेच त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या निधनाने मोठी राजकीय हानी व्यक्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. नेहमी दुसऱ्यांच्या मदतीला तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांनी कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. त्यामुळेच त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती स्वराज कौशल यांचे नाव देखील या बुकमध्ये आहे.

सुषमा स्वराज यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली होती. सुषमा यांनी लोकसभा किंवा राज्यसभेत केलेली अनेक भाषणे लोकप्रिय झाली आहेत. पण संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी केलेले भाषण देखील तितकेच लोकप्रिय आणि गाजले होते. हरियाणा राज्य सरकारच्या वतीने आयोजित हिंदी स्पर्धेत सलग 3 वर्ष पहिला क्रमांक पटकावला होता. हरियाणा विधानसभेने देखील त्यांना सर्वोकृष्ट वक्ता म्हणून गौरविले आहे.

सुषमा स्वराज यांच्या नावावर आहे हे विक्रम

सुषमा स्वराज चार वेळा केंद्रीय मंत्री होत्या. त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री देखील होत्या. इतक नव्हे तर देशाच्या पहिल्या पूर्णवेळ राहिलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पहिली सर्वोकृष्ट महिला संसद होण्याची विक्रम आहे. याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाच्या महिला प्रवक्ता आणि केवळ 25व्या वर्षी हरियाणा सरकरामध्ये कॅबिनेट मंत्री होण्याचा रेकॉर्ड स्वराज यांच्या नावावर आहे.

पतीच्या नावावर देखील आहे रेकॉर्ड

सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी विचारसरणीचे आहेत. ते सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील आहेत. त्यांची मुलगी बांसुरी देखील वकील आहे. स्वराज कौशल यांच्या नावावर सर्वात कमी वयात राज्यपाल होण्याची रेकॉर्ड आहे. ते वयाच्या 38 वर्षी मिझोरामचे राज्यपाल झाले होते. कौशल यांना ईशान्य भारतातील जाणकार मानले जाते. 1979मध्ये त्यांनी मिझो नेते लालडेंगा यांची सुटका केली होती. त्यानंतर त्यांची मिझो नॅशनल फ्रंटचे सल्लागार करण्यात आले होते. सुषमा आणि स्वराज कौशल यांची महाविद्यालयीन काळापासून ओळख होती. नंतर त्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.

VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 05:51 PM IST

ताज्या बातम्या