पाच वर्षांत दुप्पट ते चौपट वाढली 'या' नेत्यांची संपत्ती

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची संपत्ती 2009 ते 2014 या पाच वर्षांत 7 कोटींवरून 17 कोटींवर पोहचली.

  • Share this:

असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म(एडीआर) च्या एका अहवालानुसार परारष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांच्या संपत्तीत 2009 ते 2014 या काळात 122 टक्क्यांनी वाढ झाली.

सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातील खासदार आहेत. त्यांची संपत्ती 2009 मध्ये 7 कोटी इतकी होती. 2014 मध्ये 17 कोटींवर पोहचली.

मध्य प्रदेशात गुना मतदारसंघातून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे खासदार आहेत. त्यांची संपत्ती 2009 मध्ये 15 कोटी होती. त्यात वाढ होऊन 2014 मध्ये 33.08 कोटी इतकी झाली आहे.

अहवालानुसार अनेक खासदारांच्या संपत्तीत चारशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वात कमी वाढ लोकसभ खासदार आणि अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 1.07 कोटी होती.  त्यांचे वार्षिक उत्पन्नही 6 लाख रुपये इतकं आहे.

माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार सुषमा स्वराज यांचे वार्षिक उत्पन्न 2.69 कोटी रुपये आहे. तर ज्योतिरादित्य यांचे उत्पन्न 40 कोटी रुपये आहे.

सतना मतदारसंघातून चार वेळा खासदार झालेल्या भाजपच्या गणेश सिंह यांच्या संपत्तीत चारशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये 73 लाख रुपये संपत्ती असलेल्या गणेश यांची संपत्ती 2014 मध्ये 3.78 टक्क्यांवर पोहचली.

भाजपचे होशंगाबादचे खासदार उदय प्रताप सिंह यांची संपत्ती 234 टक्क्यांनी वाढली.

बैतूल मतदरासंघातील खासदार ज्योति ध्रुव यांच्या संपत्तीत 368 टक्के वाढ झाली.

ग्वाल्हेरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची संपत्ती 2009 मध्ये 34.53 लाख होती. त्यात वाढ होऊन 2014 मध्ये 1.14 कोटी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 07:31 PM IST

ताज्या बातम्या