कौस्तुभ फलटणकर,15 जून : दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सत्ताधारी एनडीएकडं जवळपास बहुमत असल्यानं राष्ट्रपती सत्ताधाऱ्यांच्या पसंतीचा होणार हे जवळपास निश्चित आहे. आतापर्यंत राष्ट्रपतीपदासाठी डॉ मुरली मनोहर जोशी , थावरचंद गहलोत ,सुषमा स्वराज ,सुमित्रा महाजन आणि द्रौपदी मुर्मू यांच्या नावांची चर्चा सुरू होती. आता या चर्चेत आणखी एक नाव समोर आलंय ते आहे सुषमा स्वराज यांचं. सुषमा स्वराज यांच्या नावावर 23 जूनला शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सुषमा स्वराज यांच्यासाठीही राष्ट्रपतीपदाचा मार्ग सोपा नाही. मोदी-शहा यांच्याशी त्यांचं फारसं सख्य नाही. त्यामुळे त्यांच्या नावाला मोदी शहांची पसंती मिळेल का हा प्रश्न आहे. राजनाथसिंह आणि व्यंकय्या नायडूंची इच्छा होती पण त्यांना उमेदवार निवड समितीत घेऊन त्यांचा पत्ता कापलाय. थावरचंद गेहलोत यांच्या नावाला विरोधक पसंती देतील का असा प्रश्न आहे. निवडणूक बिनविरोध करायचीच झाल्यास सुमित्रा महाजन यांचं नाव पुढं येण्याची शक्यता आहे.
भाजपची समिती बुधवारी सोनिया गांधी आणि येचुरींना भेटतील तेव्हाच एनडीएचे पत्ते उघड होतील. तोपर्यंत रायसिना हिल्सवर कोण जाणार याबाबत वेगवेगळी नावं दिल्लीतलं वातावरण मात्र तापवतच राहतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा