नावाआधी चौकीदार का लावता? प्रश्नाला सुषमा स्वराजांनी चतुराईनं दिलं उत्तर

नावाआधी चौकीदार का लावता? प्रश्नाला सुषमा स्वराजांनी चतुराईनं दिलं उत्तर

ट्विटरवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना जेव्हा विचारलं, तुम्ही नावाआधी चौकीदार का लावता? सुषमा स्वराज यांनी हजरजबाबीपणे दिलेलं त्याला उत्तर दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च : 2014च्या लोकसभा निवडणुकीत 'चाय पे चर्चा', शेतकरी, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्दे गाजले.  तर आता होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून मोदींवर 'चौकीदार चोर है' असं म्हणत निशाणा साधला. त्यानंतर गेल्या 5 वर्षांत कधीही चौकीदार हा शब्द जितका प्रसिद्ध नव्हता तो राहुल गांधीच्या टीकेनंतर चर्चेचा विषय झाला. पंतप्रधान मोदींनीही  मग राहुल गांधींना चौकीदार चोर नाही चौकीदार आहे आणि देशाची चौकीदारी करत आहे, अशी चपराक लगावत ट्विटरवर कॅम्पेनिंग सुरू केलं. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यानं आपल्या नावाआधी चौकीदार शब्द लावला.

ज्या भाजप मंत्र्यांनी नावाआधी चौकीदार शब्द लावला त्यांची नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं खिल्ली उडवली आहे. विरोधकांनी सोशल मीडिया आणि प्रचार सभेत मै चौकीदार कॅम्पेनिंगची फिरकी घेतली आहे.

एक तरुणाने ट्विटरवर सुषमा स्वराज यांना स्वत:ला चौकीदार का म्हणता याबाबत प्रश्न केला. तरुणाने विचारलं, ‘सुषमाजी तुम्ही आमच्यासाठी परराष्ट्रमंत्री आहात, तुम्ही समजूतदार आहात. तुम्ही तुमच्या नावाआधी चौकीदार असं का लिहिता?’

सुषमा स्वराज यांनी त्या तरुणाला हजरजबाबीपणाने ट्विटरवरून उत्तर दिलं. सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘मी परदेशात जाते तेव्हा मी भारताची चौकीदारी करते.’

2019च्या लोकसभा निवडणुकीत बाकी मुद्द्यांसोबतच मैं भी चौकीदार गाजणार असं दिसतं आहे. नेटकऱ्यांनी याची खिल्ली उडवली असली तरीही भाजप मंत्र्यांनी मात्र विरोधकांना सडेतोड उत्तरं दिलं आहे. सोशल मीडियावरील शाब्दिक चकमकीत भाजप आघाडीवर असलं तरी लोकसभेच्या रिंगणात कोण बाजी मारणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO: मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अद्दल घडविण्याची ही वेळ - राजनाथसिंह

First published: March 30, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading