सुषमा स्वराज 'आंध्र'च्या राज्यपाल? केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटने चर्चेला उधाण

सुषमा स्वराज 'आंध्र'च्या राज्यपाल? केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटने चर्चेला उधाण

सुषमा स्वराज यांच्यासोबतच सुमित्रा महाजन, उमा भारती, कलराज मिश्र, करिया मुंडा, भगत सिंह कोश्‍यारी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्या नावांची राज्यपाल पदासाठी चर्चा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 जून : माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी केलंय. मात्र या नियुक्तीची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. देशातल्या 10 राज्यांच्या राज्यापालांची मुदत आता संपणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नव्या नियुक्त्या होणं अपेक्षीत आहे. हे ट्विट केल्यानंतर त्याची चर्चा झाली नंतर मात्र हर्षवर्धन यांनी ते ट्विट डिलीट केलं.

या दहा राज्यांमध्ये कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा सुरू असतानाच हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांचं ट्विटरवरून अभिनंदनही केलंय. स्वराज यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी ही निवडणुक लढविणार नसल्याची घोषणा केली होती.

परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून 24 तास जगभारतल्या भारतीयांच्या अडचणी सोडविण्याचं काम केलं. शेकडो लोकांना मदत केली. पाकिस्तानच्या नागरिकांनाही औषधोपचारासाठी भारतात येण्यासाठी त्यांनी मदतीचा हात दिला.

सुषमा स्वराज यांच्यासोबतच सुमित्रा महाजन, उमा भारती, कलराज मिश्र, करिया मुंडा, भगत सिंह कोश्‍यारी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्या नावांची राज्यपाल पदासाठी चर्चा आहे.

राहुल गांधींना सोडावं लागणार घर?

लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना नव्याने घरं देण्यात येणार आहेत. यासाठी लोकसभेच्या सचिवालयाने रिकाम्या घरांची यादी बनवली आहे. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या रिकाम्या घरांच्या यादीत राहुल गांधींच्या घराचंही नाव आहे.

12 तुघलक लेन

राजधानीतलं '12 तुघलक लेन' हे राहुल गांधींचं अधिकृत निवासस्थान. 2004 साली राहुल गांधी जेव्हा अमेठीतून खासदार झाले तेव्हापासून ते याच घरात राहतात. राहुल गांधींचं हे निवासस्थान घरांच्या उच्च श्रेणीमध्ये येतं. पण आता मात्र लोकसभेच्या सचिवालयाच्या यादीत त्यांचं घर रिकाम्या घरांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.

First published: June 10, 2019, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading