लोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीबाबत सुषमा स्वराज यांची मोठी घोषणा

सुषमा स्वराज्य या सध्या मध्य प्रदेशमध्ये असून त्या तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपण 2019 साली होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी हा निर्णय जाहीर केला. तसंच आपल्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत स्वराज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही माहिती दिली आहे.

सुषमा स्वराज्य या सध्या मध्य प्रदेशमध्ये असून त्या तेथील विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करत आहेत. स्वराज या मध्य प्रदेशमधूनच भाजपच्या खासदार आहेत.

आजारी असल्याने सुषमा स्वराज लोकसभा निवडणूक लढणार नाहीत, असा अंदाज अनेक दिवसांपासून बांधला जात होता. आता देखील आजारपणामुळे त्यांना अनेकदा सतत रुग्णालयात दाखल व्हावं लागल्याचं पाहायला मिळतं. स्वराज यांनी निवडणूक लढवण्याबाबत अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज या भाजपमधील एक अनुभवी नेत्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे.

VIDEO : 'अवनी'चे दोन बछडे कॅमेऱ्यात झाले ट्रॅप

First published: November 20, 2018, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading