Home /News /national /

'भाजपनं आतापर्यंत कोणत्या दलित नेत्याला मोठं केलं' सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

'भाजपनं आतापर्यंत कोणत्या दलित नेत्याला मोठं केलं' सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

काँग्रेसनं माझ्या सारख्या दलित नेत्याला मोठ केलं, मात्र भाजपानं आतापर्यंत कोणत्या दलित नेत्याला मोठ केलं ते सांगावं, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींवर टीका केली आहे.

07 मे : देशात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी चुप्पी साधुन बसले आहेत. काँग्रेसनं माझ्या सारख्या दलित नेत्याला मोठ केलं, मात्र भाजपानं आतापर्यंत कोणत्या दलित नेत्याला मोठ केलं ते सांगावं, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसनं भ्रष्ट्राचार केल्याचं मोदी म्हणत असतील तर येडीयूराप्पा आणि रेड्डीं यांचं बंध नेमक काय आहे आणि यांनी कर्नाटकात आतापर्यंत नेमकं काय केलं हे मोदींनी स्पष्ट करावं असंही सुशिल कुमार शिंदे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाविषयी बोलत नाहीत. फक्त नेहरू गांधी विषयी बोलतात. दलितांवरील अत्याचार विषयी बोलत नाहीत. मोदी फक्त शाब्दिक आरोप करतात, अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे.
First published:

Tags: BJP, Narendra modi, Rahul gandhi, Sushilkumar shinde, टीका, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे

पुढील बातम्या