बिहारमध्ये भाजपने सुशील कुमार मोदींचा कट केला पत्ता, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान!

बिहारमध्ये भाजपने सुशील कुमार मोदींचा कट केला पत्ता, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान!

महाराष्ट्रात सत्ता वाटपाचा अनुभव पाठिशी असल्याने पक्षाने सुशील कुमार मोदी यांचं मन वळविण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकली होती.

  • Share this:

नवी दिल्ली 16 नोव्हेंबर: बिहारमध्ये भाजपने दिग्गज नेते सुशील कुमार मोदी यांचा पत्ता कट केलाय. नितीश कुमार यांच्यासोबत दीर्घकाळ उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं. मात्र यावेळी पक्षाने दुसऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे मोदी हे नाराज असल्याचंही बोललं जातं. पक्षाचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मोदी हे नाराज नाहीत. पक्ष त्यांच्या अनुभवाचा उपयोग नक्की करून घेणार असल्याचं सांगितलं. ते पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात सत्ता वाटपाचा अनुभव पाठिशी असल्याने पक्षाने सुशील कुमार मोदी यांचं मन वळविण्याची जबाबदारी फडणवीसांवर टाकली होती. फडणवीस म्हणाले, सुशील कुमार मोदी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊ. त्यांना पक्षात वेगळी जबाबदारी दिली जाणार आहे. लोकांनी एनडीचं सरकार राज्यात निवडून दिलं असून ते 5 वर्ष काम करणार आहे. असंही त्यांनी सांगितलं.

तर सुशील कुमार मोदी यांना संधी का दिली नाही ते मला माहित नाही. हा प्रश्न आणि त्याचं उत्तर भाजपकडूनच मिळवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी व्यक्त केली. अशा प्रसंगी सुशील कुमार मोदींची आठवण येते का या प्रश्नावर त्यांनी होय असं उत्तर दिलं.

नितीश कुमार बिहारचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली (Nitish Kumar takes oath as the CM of Bihar for the seventh time). राजभवनावर हा शपविधी सोहळा झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. भाजपने नवी खेळी करत ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा पत्ता कट केला आहे. त्यांना दिल्लीत जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपने तारकिशोर प्रसाद (Tarkishore Prasad) आणि रेणू देवी (Ranu Devi) यांची निवड केली आहे.

नितीश कुमार यांच्यानंतर भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतलीय. त्यानंतर जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली. शीला कुमारी या पहिल्यांदाच मंत्री झाल्या आहेत.

हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली.

तर भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय  मंगल पांडेय, अमरेंद्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या  वाटाघाटीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रातल्या जागा वाटपापासून ते सत्तेतल्या वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 16, 2020, 9:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या