गांधी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, सुशीलकुमार शिंदे काँग्रेस अध्यक्षपदी : सूत्र

गांधी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय, सुशीलकुमार शिंदे काँग्रेस अध्यक्षपदी : सूत्र

गांधी कुटुंबाकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. कारण गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने नवा अध्यक्ष कोण होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण आता याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुशीलकुमार शिंदे हेच जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी मराठी व्यक्ती या पदावर बसणार आहे.

शिंदे यांच्यासोबत कोण आहे स्पर्धेत?

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा, अशी इच्छा राहुल गांधी यांनी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. राहुल गांधी यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर काँग्रेस वर्किंग समिती काही नावांवर चर्चा केली गेली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव आधी आघाडीवर होतं. पण अखेर सुशिलकुमार शिंदे यांनी बाजी मारली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मल्लिकार्जून खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट, पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

राहुल गांधींची घेणार भेट?

सुशीलकुमार शिदे आज राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यानच शिंदे यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. गांधी कुटुंबाचे सल्लागार, ज्येष्ठ नेते आणि इतरही मुख्य नेत्यांकडून शिंदे यांच्या नावाची शिफारस केली गेली होती, अशी माहिती आहे.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

First published: June 30, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading