Home /News /national /

'कोरोनामुळे माध्यमांची परिस्थिती बिकट; FB, Google कडून बातम्यांसाठी शुल्क घेण्यासाठी कायदा करावा'

'कोरोनामुळे माध्यमांची परिस्थिती बिकट; FB, Google कडून बातम्यांसाठी शुल्क घेण्यासाठी कायदा करावा'

'मीडिया इंडस्ट्रीकडून विश्वासार्ह बातम्यांचे प्रसारण केले जाते, परंतू त्याचा नफा गुगलला होतो आहे', असे मत व्यक्त करत सुशीलकुमार मोदी यांनी याबाबत कायदा करण्याची मागणी केली आहे

    नवी दिल्ली, 18 मार्च: गुगल (Google), फेसबुक (Facebook), यू-ट्यूब (YouTube) यांसारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी त्यांचा जाहिरातीच्या उत्पन्नातून माध्यम कंपन्यांना वाटा द्यावा, अशी तरतूद असलेला कायदा करण्याची मागणी सुशीलकुमार मोदी यांनी संसदेमध्ये केली होती. News18 शी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'मीडिया इंडस्ट्री त्यांच्या रिपोर्टर्स, करस्पाँडंट्स आणि विविध उपकरणांसाठी मोठा पैसा गुंतवते. त्यांच्याकडून विश्वासार्ह बातम्यांचे प्रसारण केले जाते, परंतू त्याचा नफा गुगलला होतो आहे.' सोशल मीडियावरील (Social Media) बातम्यांसंदर्भात ऑस्ट्रेलिया सरकारने (Australia) केलेल्या नवा कायद्याचे पडसाद जगातल्या विविध देशांत उमटू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या त्या कायद्यानुसार फेसबुक, गुगल यांसारख्या कंपन्यांना ऑस्ट्रेलियात बातम्या दाखवण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी माध्यम संस्थांना त्यांच्या पत्रकारितेबद्दल शुल्क दिलं पाहिजे, असं ऑस्ट्रेलिया सरकारचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमिवर सुशीलकुमार मोदी (Sushilkumar Modi) यांनी या मुद्दा उपस्थित केला. याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'ऑस्ट्रेलियामध्ये, सरकारने या तंत्रज्ञान दिग्गजांना (Tech Giants) बातम्यांच्या कंटेटसाठी पैसे देण्यास सांगितले आहे, जे ते मोफत वापरत आहेत. हे सोपे नव्हते. या कंपन्यांनी त्याठिकाणी मोठी मक्तेदारी आहे आणि या मोठ्या कंपन्या आहेत, तरीही ऑस्ट्रेलियाने ते केले.' (हे वाचा-काँग्रेसमध्ये मोठे होणार फेरबदल, या नेत्याला मंत्रिपद देण्याची शक्यता) भारतीय मीडियाबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 'महसुलात तोटा आणि कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे भारतीय मीडिया आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करत आहे. आणि या टेक जायंट्सनी बातम्यांचे पैसे द्यावेत याकरता कायदे करण्याबाबत सरकारकडे विचारणा केली आहे. या विषयावर माहिती व प्रसारण खात्याला देखील निवेदन लिहण्याचा मी विचार करत आहे. ' संसदेमध्ये हा मुद्दा मांडताना सुशीलकुमार मोदी यांनी असे वक्तव्य केले होते की, 'आपण या बाबतीत ऑस्ट्रेलियाप्रमाणे वागलं पाहिजे. न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड (News Media Bargaining Code) लागू करून ऑस्ट्रेलियाने (Australia) यात आघाडी घेतली आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या संसदेने याबाबतचा कायदा पारित करून गुगलला माध्यमांशी जाहिरातीचा निधी वाटून घेण्यास भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलियाने नवा पायंडा पाडला असून, त्यापाठोपाठ फ्रान्ससह अन्य देश असे कायदे करत आहेत. त्यामुळे भारतानेही आता यासाठी पुढाकार घेऊन गुगल आणि फेसबुककडून माध्यम संस्थांना जाहिरातीच्या उत्पन्नातला वाटा शेअर करण्यासंदर्भात कायदा करायला हवा'.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Australia, Facebook, Google, Sushilkumar modi, Youtube

    पुढील बातम्या