मराठी बातम्या /बातम्या /देश /Sagar Dhankhad Murder : त्या रात्री नेमकं काय घडलं? ज्यामुळे कुस्तीपटू सुशील कुमार पोहोचला गजाआड

Sagar Dhankhad Murder : त्या रात्री नेमकं काय घडलं? ज्यामुळे कुस्तीपटू सुशील कुमार पोहोचला गजाआड

Sagar Dhankhad Murder case ऑलिम्पकमध्ये दोन पदकं जिंकणाऱ्या रेसलर सुशील कुमार (Sushil Kumar) ला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर ज्युनियर पहिलवान सागर धनखडच्या हत्येचा आरोप आहे. पण सुशीलनं हा आरोप फेटाळला आहे.

Sagar Dhankhad Murder case ऑलिम्पकमध्ये दोन पदकं जिंकणाऱ्या रेसलर सुशील कुमार (Sushil Kumar) ला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर ज्युनियर पहिलवान सागर धनखडच्या हत्येचा आरोप आहे. पण सुशीलनं हा आरोप फेटाळला आहे.

Sagar Dhankhad Murder case ऑलिम्पकमध्ये दोन पदकं जिंकणाऱ्या रेसलर सुशील कुमार (Sushil Kumar) ला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर ज्युनियर पहिलवान सागर धनखडच्या हत्येचा आरोप आहे. पण सुशीलनं हा आरोप फेटाळला आहे.

नवी दिल्ली, 23 मे : ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) याला ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhad Murder case) अटक झाली आहे. सुशील कुमार दोन आठवड्यांपासून फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारनं या प्रकरणी कोर्टात धावही घेतली. पण त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(वाचा-मृत्यूनंतरही अवहेलनाच! रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहाला लागल्या मुंग्या)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, 4 मेच्या रात्री उशिरा दिल्लीच्या मॉडेल टॉउन ठाण्याच्या परिसरात सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या मते सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण झाली. फुटेजवरूनही हे स्पष्ट झालं असून, सुशीलही यात दिसत आहे.

(वाचा- दत्तक देण्याच्या नावाखाली 2 लाखांमध्ये लहान मुलाची विक्री, महिलेला अटक)

सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते असंही समोर येत आहे. एकेकाळी सुशीलला आदर्श मानणारा सागर आधी ज्या फ्लॅटमध्ये मित्रांबरोबर भाड्याने राहायचा तोही सुशीलच्या पत्नीचा होता. पण सागरने भाडं न देताच फ्लॅट सोडला. सुशील कुमारनं अनेकदा भाड्याचे पैसे मागितले. पण सागर टाळाटाळ करत होता. तसंच अनेक पहिलवान हे छत्रसाल स्टेडियम सोडून गेले होते. शिवाय सागरबरोबरही अनेक पहिलवान जाणार होते. त्यामुळं स्टेडियममधून मोठे क्रीडापटू जातील यामुळंही सुशील सागरवर नाराज होता. त्यानंतर हा प्रकार घडला. पण सुशीलनं तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

पोलिसांच्या तपासात हे आले समोर

- 4-5 मे च्या रात्री पहिलवान सागरची हत्या झाली

- 6 मे रोजी सुशील कुमार हरिद्वार-ऋषिकेशच्या एका मोठ्या बाबांच्या आश्रमात राहिला

- त्यानंतर 7 मेला तो पुन्हा दिल्लीला परत आला

- त्यानंतर सुशीलकुमार बहादुरगडला गेला

- बहादुरगडहून सुशील कुमार चंडीगडला गेला

- चंडीगडहून तो परत भठिंडा इथं आला

- पुन्हा भठिंड्याहून चंडिगडला गेला

- त्यानंत पुन्हा चंडिगडहून सुशील गुरुग्रामला आला

- गुरुग्रामहून वेस्ट दिल्लीला आला आमि त्यानंतर 23 मे ला मुंडकामध्ये अटक झाली

8 वर्षांपासून घेत होता ट्रेनिंग

सागरचे वडील अशोक धमखड दिल्ली पोलिसांत कॉन्सटेबल आहेत. त्यांनी सांगितलं की, सागर 8 वर्षांपासून छत्रसालमध्ये ट्रेनिंग घेत होता. तो सुशील कुमारलाच गुरू मानत होता. मी माझ्या मुलाला महाबली सतपाल यांच्याकडे सोपवलं होतं. माझा मुलगा देशासाठी पदक जिंकेत असं सतपाल यांनी सांगितलं होतं. आता दिल्ली पोलिसांच्या मते त्याच्याकडं सुशील कुमारविरोधात पुरेसे पुरावे आहे. त्यामुळं पुढं काय होणार याची आता उत्सुकता आहे.

सुशील कुमारची कामगिरी

सुशील कुमार भारतीय कुस्तीच्या इतिहासातील मोठं नाव आहे. त्यानं ऑलिम्पिकशिवाय वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्यटे 2010 मध्ये गोल्ड, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 2010, 2014 आणि 2018 मध्ये गोल्ड, एशियन गेम्स 2006 मध्ये कांस्य आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये 2003 मध्ये कांस्य, 2007 मध्ये सिलव्हर 2008 मध्ये कांस्य आणि 2010 मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. 2005 मध्ये अर्जुन अवॉर्ड तर 2009 मध्ये क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्करा त्याला मिळाला होता. 2011 मध्ये त्याला पदमश्रीनं देखिल सन्मानित करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Delhi, Murder, Wrestler