रिया चक्रवर्तीनंतर सुशांतच्या वडिलांनीही घेतला मोठा निर्णय, वकिलांनी दिले संकेत

रिया चक्रवर्तीनंतर सुशांतच्या वडिलांनीही घेतला मोठा निर्णय, वकिलांनी दिले संकेत

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतचे वडील केके सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 29 जुलै: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी पाटण्यात रिया चक्रवर्तीवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर तिने सुप्रीम कोर्टात अर्ज करत अटकपूर्व जामीनीसाठी प्रयत्न सुरू केले होते. आता सुशांतच्या वडिलांनीही सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांच्या वतिनेही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांचे वकील विकास सिंग यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय देण्याआधी आता कुटुंबाची भूमिकाही कोर्टाला विचारात घ्यावी लागणार आहे.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आता सुशांतच्या कुटुंबीय पुढे आले आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतचे वडील केके सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत. यानंतर रियानेही केस दाखल होताच देशातील सर्वात महागड्या वकिलांमधील सतीश मानेशिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

सतीश मानेशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढली होती. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. तर रियाने केस जिंकण्यासाठी सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. त्यांनी संजय दत्त याचा 1993 मधील मुंबई ब्लास्ट केस आणि सलमान खान याची 1998 मधील काळवीट शिकार प्रकरणाची केस लढवली होती.

"रियाने सुशांतचा छळ केला", एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही सोडलं मौन

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर सातत्याने मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. याप्रकरणी आता बिहार पोलीस देखील तपास करत आहे. बिहार पोलिसांचा तपास स्वतंत्रपणे सुरू झाला आहे.

"सुशांतची गॅझेट्स अजूनही रियाकडेच", पुराव्यानिशी कंगनाने केले खळबळजनक आरोप

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी CBIकडे देण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, घटनेचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे. सीबीआयकडे तापस देण्याची आवशक्यता नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 29, 2020, 11:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या