सुषमा स्वराज यांनी स्वत:हून सोडला सरकारी बंगला

सुषमा स्वराज यांनी स्वत:हून सोडला सरकारी बंगला

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीतल्या सफरदरजंगमधलं आपलं निवासस्थान स्वत:हून सोडलं. 'मी माझं सरकारी निवासस्थान रिकामं केलं आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या पत्त्यावर माझ्याशी संपर्क होणं शक्य नाही', असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीतली राजकीय समीकरणं बदलली आहेत. नवे मंत्री, नवे खासदार यांना सरकारी बंगले दिले जात आहेत. त्यामुळे जे आता पदावर नाहीत त्यांनी त्यांचे बंगले रिकामे करणं अपेक्षित आहे. निवडणुकीत पराभव झाला, पद गेलं तरी काहीजण आपली सरकारी निवासस्थानं सोडायला तयार नसतात. पण माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मात्र आपल्या वर्तनाने चांगलं उदाहरण घालून दिलं आहे.

पुणे दुर्घटना: इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 15 ठार, बिल्डर्सविरोधात गुन्हा

त्यांनी नवी दिल्लीतल्या सफरदरजंगमधलं आपलं निवासस्थान स्वत:हून सोडलं. याची माहिती सुषमा स्वराज यांनीच त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिली आहे.'मी माझं सरकारी निवासस्थान रिकामं केलं आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या पत्त्यावर माझ्याशी संपर्क होणं शक्य नाही', असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

निवडणूक न लढण्याचा निर्णय

सुषमा स्वराज यांनी त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे सरकारी बंगल्यावर आता सुषमा स्वराज यांचा हक्क राहिला नाही.

सुषमा स्वराज यांनी स्वत:हून सरकारी निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोक त्यांची प्रशंसा करत आहेत.सुषमांनी इतर मंत्री आणि खासदारांसमोर चांगलं उदाहरण घालून दिलं आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरही व्यक्त होत आहेत.

=================================================================================================

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

First Published: Jun 29, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading