राहुलच्या 'जोड्या'वरून वाद पेटला, सुषमा स्वराज यांनी या शब्दात दिलं उत्तर

राहुल गांधींनी अडवाणींबदद्ल केलेल्या वक्तव्यावरून सुषमा स्वराज यांनी त्यांना फटकारलं आहे. अडवाणी हे आम्हाला गुरुस्थानी आहेत, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी अडवाणींबदद्ल केलेल्या वक्तव्यावरून सुषमा स्वराज यांनी त्यांना फटकारलं आहे. अडवाणी हे आम्हाला गुरुस्थानी आहेत, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, ६ एप्रिल : भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना फटकारलं आहे. 'अडवाणीजी हे आम्हाला पितृस्थानी आहेत. तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तारतम्य बाळगा', अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना सुनावलं आहे. 'अडवाणींबद्दल आदर नाही' राहुल गांधींनी चंद्रपूरच्या सभेत अडवाणींच्याबद्दल मानहानीकारक विधान केलं होतं. 'भारतीय जनता पक्षाचे नेते अडवाणींना गुरू मानतात. पण मोदींनी त्यांना कधीच आदर दाखवला नाही. अडवाणींना जोडे मारून पक्षाबाहेर काढण्यात आलं,' असं मानहानीकारक वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. 'भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर करण्याची संस्कृती नाही. हिंदू धर्मामध्ये गुरु - शिष्य परंपरेला महत्त्वाचं स्थान आहे पण भाजपचे जे नेते हिंदुत्वाचा उल्लेख करतात त्यांनाच या परंपंरेचा विसर पडला आहे', अशी टीका राहुल गांधींनी केली होती. अडवाणींचा ब्लॉग भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, अशी चर्चा असतानाच लालकृष्ण अडवाणी यांच्या एका ब्लॉगची त्यात भर पडली. 'ज्यांचे आमच्याशी मतभेद आहेत त्यांना आम्ही कधीच देशद्रोही ठरवलं नाही', असं अडवाणी यांनी म्हटलं होतं. मोदींचं उत्तर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अडवाणी यांच्या ब्लॉगला उत्तर दिलं. भाजपचा एक कार्यकर्ता या नात्याने मला भाजपचा अभिमान आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपला आणखी मजबूत केलं आहे, असं मोदी म्हणाले. लालकृष्ण अडवाणी यांच्या या ब्लॉगची संधी घेत विरोधकांनी भाजपवर टीका केली. राहुल गांधींचं वक्तव्य हा त्याच रणनीतीचा भाग आहे, असं बोललं जातं. पण सुषमा स्वराज यांनीच आता राहुल गांधींना फटकारल्यामुळे भाजपची भूमिका स्पष्ट झाली आहे. ===================================================================================================================================================================== VIDEO: माझं नाव आफताबजहाँ, पण मला 'हा' मराठमोळा लुक भारी आवडतो
    First published: