मुंबई, 19 नोव्हेंबर : 2020 या वर्षातलं शेवटचं ग्रहण हे 14 डिसेंबरला झालं. हे शेवटचं ग्रहण होतं जे भारतातून दिसलं नाही तर अमेरिकेच्या दक्षिण भागातून दिसणार होतं. आता नव्या वर्षात खगोलप्रेमींसाठी एकूण 4 ग्रहणांची पर्वणी आहे. 2 सूर्य तर 2 चंद्र ग्रहण नव्या वर्षात दिसणार आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणही होणार आहेत. ग्रहणाच्या दृष्टीने नवीन वर्ष विशेष आहे. हे ग्रहण कधी आणि केव्हा होईल आणि तिची तारीख काय आहे हे आपल्याला माहीत असावे. हे ग्रहण कुठे दिसेल आणि कोणत्या तारखेला असेल याबाबत अधिक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सूर्यग्रहण
10 जून 2021- नव्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण जून महिन्यात होणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसेल की नाही याबाबत अद्याप शंका आहे. पण काही स्वरुपात पाहता येऊ शकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर हे ग्रहण अमेरिकेच्या उत्तर भागात, युरोप आणि आशियामधील काही स्वरुपात, उत्तर कॅनडा, रशिया आणि ग्रीनलँडमधील नागरिकांना पाहता येणार आहे.
4 डिसेंबर 2021- 2021 वर्षात दुसरं आणि शेवटचं सुर्यग्रहण डिसेंबर महिन्यात होणार आहे. हे अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतून पाहता येणार आहे. तर भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही.
हे वाचा-Oppo च्या या स्मार्टफोनची जबरदस्त धूम;10 मिनिटांत 100 कोटींहून अधिक फोनची विक्री
चंद्रग्रहण
26 मे 2021 : वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल जे पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर आणि अमेरिकेत पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतात हे ग्रहण पाहता येणार आहे. साधारण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी ते संध्याकाळी 7 पर्यंत हे ग्रहण लागणार आहे.
19 नोव्हेंबर 2021 : नोव्हेंबर महिन्यात दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे. 2021 वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. हा योग दुपारी 11.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे. हे ग्रहण भारत, अमेरिका, उत्तर युरोप, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत महासागरातून दिसणार आहे.
सूचना- ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे न्यूज 18 लोकमत या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.