मुख्यमंत्र्यांवर खूश होवून एका बापाने मुलाचं नाव ठेवलं चक्क कॉंग्रेस

मुख्यमंत्र्यांवर खूश होवून एका बापाने मुलाचं नाव ठेवलं चक्क कॉंग्रेस

बाळाचे नाव ठेवताना लोक कितीतरी विचार करून ते ठेवतात, पण सध्या एका बापाने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई,22 जानेवारी: सोशल मिडीयावरील एक बातमी सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही बातमी आहेच अशी की सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे आणि म्हणूनच याची चर्चा आहे. एका बापाने आपल्या बाळाचं जे नाव ठेवलंय ते ऐकताच सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. लहान बाळाचं नाव ठेवायचं म्हटलं की कित्येक लोकांना विचारंल जातं, त्याचे अर्थ वगैरे शोधून शोभणारं नाव ठेवलं जातं. अनेकदा समाजात आपल्या चांगल्या कार्यामुळे ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं अशा महान लोकांचे नाव आपल्या मुलाला ठेवण्यासाठी निवडलं जातं. जे सिनेमा, कला क्षेत्रातील कलाकारांचे चाहते असतात ते आपल्या मुलासाठी या कलाकारांचं नाव निवडतात. मात्र या घटनेत बाळाचं जे नाव ठेवलं आहे ते वेगळं आहे.  याच कारणामुळे त्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

बाळाच्या नावाने सगळेच आचंबित

राजस्थानमधील विनोद जैन सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या मुलाला चक्क एका राजकीय पक्षाचं नाव ठेवलं आहे, जैन राजस्थानच्या मुख्यंमंत्र्यांच्या कारभारावर प्रचंड खूश आहेत. या आनंदाच्या भरात त्यांनी आपल्या मुलाचं नाव मुख्यमंत्री ज्या पक्षातले आहेत त्या पक्षाचं दिलय. विनोद जैन हे स्वत: मुख्यमंत्री कार्यालयात मीडिया अधिकारी पदावर काम करतात. मंगळवारी त्यांच्या मुलाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. मात्र यावेळी बाळाच्या नामकरण सोहळ्याला आलेले सर्वजण बाळाचं नाव ऐकून आचंबित झाले. सर्वांना अनपेक्षित असं हे नाव असल्यानं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आणि एकच चर्चा सुरू झाली.

कोण आहेत हे मुख्यमंत्री ज्यांच्यावर खूश होत ठेवण्यात आलं बाळाचं नाव

राजस्थान राज्यातील उदयपूर इथले विनोद जैन यांनी आपल्या बाळाचं नाव कॉंग्रेस असं ठेवलय. जैन यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या संपुर्ण कुटुंबाची कॉंग्रेस पक्षावर खूप निष्ठा आहे. आमचं पुर्ण कुटुंब कॉंग्रेस पक्षाशी जोडलं गेलंय त्यामुळे आमची पुढची पिढी देखील भविष्यात पक्षाशी एकनिष्ठ रहावी यासाठी मी थेट माझ्या मुलाचे नाव काँग्रेस ठेवलं असं जैन म्हणाले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्याने जैन प्रभावित आहेत. ते म्हणाले की, जेव्हा माझा मुलगा 18 वर्षांचा होईल तेव्हा त्याचं राजकीय करिअर सुरू होइल. मुलगा मोठा होऊन पक्षात मोठी जबाबदारी पार पाडेल अशी आशा आहे.

VIDEO : दोन बायकांच्या बेदम हाणामारीतमध्ये पडला वकील, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 04:57 PM IST

ताज्या बातम्या