पतीने दुसऱ्या महिलेला आणलं घरी, पत्नीने सुसाइड नोट लिहून घेतलं विष

पतीने दुसऱ्या महिलेला आणलं घरी, पत्नीने सुसाइड नोट लिहून घेतलं विष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोटमध्ये महिलेने पतीवर आरोप केले होते.

  • Share this:

छत्तीसगड, 18 मे : पतीसोबत झालेल्या वादामुळे एक महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे महिलेने विष प्राशन करण्याआधी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ज्यामध्य़े महिलेने पती, ननंद आणि सासूवर धोका दिल्याचा आरोप केला आहे.

माझ्या आत्महत्येमागे माझा पती, ननंद आणि सासूचा हात असल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहण्यात आलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सगळ्यांच्या त्रासाला वैतागून महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

शेजाऱ्यांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात नेल्यामुळे महिलेचा जीव वाचला आहे. तिच्यावकर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाइड नोटमध्ये महिलेने पतीवर आरोप केले होते. 'पती दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आला आहे. तो तिच्यासोबत राहतो. तो मला स्वीकारण्यासाठी तयार नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे' असंही महिलेने सुसाइड नोटमध्ये म्हटलं होतं.

पती सुनील जायसवाल, ननंद आणि सासूने घर बनवण्यासाठी महिलेकडून 2 लाख रुपयांची मदत घेतली पण त्यानंतरही तिला स्वीकारण्यासाठी नकार दिला. पती दुसऱ्या महिलेसोबत राहतो. या सगळ्याचा मानसिक त्रास झाल्यामुळे महिलेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकरणार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. तर यामध्ये पोलीस पीडित महिलेल्या कुटुंबाची चौकशी करणार आहेत.

या आहेत आतापर्यंतच्या टाॅप 18 बातम्या, पाहा हा VIDEO

First published: May 18, 2019, 5:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading