News18 Lokmat

'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारा अधिकारी राहुल गांधींच्या तंबूत!

सरकारने आणि सुरक्षा दलांनी कारवाईचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतला पाहिजे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 08:09 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारा अधिकारी राहुल गांधींच्या तंबूत!

नवी दिल्ली 21 फेब्रुवारी :  'सर्जिकल स्ट्राईक'चा निर्णय हा सर्वात धाडसी निर्णय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत असतात. 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर देशात प्रचंड वादळही निर्माण झालं होतं. या अत्यंत धाडसी 'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारे माजी लष्करी अधिकारी  डी.एस.हुडा हेच आता काँग्रेसच्या तंबूत गेले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर एक नवी जबाबदारी टाकली आहे.


दोन वर्षांपूर्वी उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सीमेवरच्या दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून ते तळ उध्वस्त केले होते. देशभर ही कारवाई गाजली होती. हुडा हे त्यावेळी नॉदर्न कमांडचे प्रमुख होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही कारवाई झाली होती. त्यामुळे त्यांचे काँग्रेसच्या तंबूत जाणं महत्तवाचं समजलं जात आहे.Loading...


पुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. या गटात काही संरक्षण तज्ज्ञ असून त्याचं नेतृत्व हुडा करणार आहेत. हा गट अभ्यास करून एक अहवाल तयार करणार आहे.

मोदी ज्या कारवाईचा अभिमानाने उल्लेख करतात त्या कारवाईचा प्रमुखच काँग्रसकडे वळल्याने सोशल मीडियावर भाजपला नेटकऱ्यांनी टोमणे हाणले आहेत.


तर 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आला याचा पुरावा काँग्रेसला मिळाला आहे असंही नेटकऱ्यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. सर्जिकल स्ट्राईकची गरज होती असं मत हुडांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सरकारने आणि सुरक्षा दलांनी  कारवाईचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...