'अरविंद केजरीवालांना थप्पड लगावल्याचा मला प्रचंड पश्चाताप होतोय'

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थप्पड लगावणारा सुरेश याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 07:25 AM IST

'अरविंद केजरीवालांना थप्पड लगावल्याचा मला प्रचंड पश्चाताप होतोय'

नवी दिल्ली, 10 मे : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थप्पड लगावणारा सुरेश याची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहातून बाहेर येताच त्यानं म्हटलं की, 'मुख्यमंत्री केजरीवाल यांना थप्पड लगावल्याबाबत मला खूप पश्चाताप होत आहे. ही घटना कशी आणि कशाकरता घडली? हे मलादेखील माहिती नाही'.

रोड शोमध्ये अरविंद केजरीवाल यांना लगावली थप्पड

अरविंद केजरीवाल 4 मे रोजी मोतीनगर विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीचे उमेदवार बृजेश गोयल यांच्यासाठी रोड शो करत होते. या रोड शोदरम्यान सुरेशनं जीपवरून चढून अरविंद केजरीवाल यांना सर्वांसमोर जोरदार थप्पड लगावली. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

या घटनेनंतर आम आदमी पार्टीच्या कित्येक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, 'मोदी आणि अमित शहा यांना आता केजरीवालांची हत्या घडवून आणायची आहे का?'

तर आप खासदार संजय सिंह म्हणाले की,'दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा मोदी सरकारच्या अधीन आहे, मात्र केजरीवाल यांचे जीवन आता अत्यंत असुरक्षित आहे. केजरीवालांवरील हल्ला हा एका कटाचा भाग होता.'

Loading...दुसरीकडे, या घटनेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. केजरीवालांच्या सुरक्षेसाठी आता 4-4 अतिरिक्त जवान आणि आसपास 6 सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.
VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 07:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...