मोदींवर टीका केल्यामुळे नाराज सुरेशने लगावली केजरीवालांच्या श्रीमुखात!

मोदींवर टीका केल्यामुळे नाराज सुरेशने लगावली केजरीवालांच्या श्रीमुखात!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदीनर येथील कर्मपूरा येथील एका प्रचार सभेत श्रीमुखात लगावली.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदीनर येथील कर्मपूरा येथील एका प्रचार सभेत श्रीमुखात लगावली. केजरीवाल आम आदमी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गोयल यांच्यासाठी रोज शो करत होते. एका युवकाने केजरीवाल ज्या जीपमधून रोड शो करत होते त्यावर चढून त्यांना श्रीमुखात लगावली. ज्या व्यक्तीने त्यांना श्रीमुखात लगावली त्याचे नाव सुरेश असे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पाहा- VIDEO : केजरीवालांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीची तुफान धुलाई

केजरीवाल यांना अशा प्रकारे मारहाण करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एक दोन वेळा नव्हे तर 12 वेळा केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला आहे. सुरेश याने केजरीवाल यांना का मारले याचे कारण अद्याप समोर आले नाही. पण सुरेशची पत्नी ममता यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली त्यांना आवडत नाही. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली.

पाहा- PHOTOS : चप्पल, बूट, अंडी, शाई, तिखट आणि थप्पडही, केजरीवाल यांच्यावर तब्बल 12 वेळा हल्ला

सुरेश यांना PM मोदी यांची टीका सहन होत नाही. काही दिवसांपूर्वी सुरेश याने शिवचरण गोयल यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा गोयल यांनी मोदींवर टीका केली होती. त्यामुळे सुरेश प्रचंड नाराज होते, असे ममता यांनी सांगितले.

जे लोकप्रतिनिधी चांगले काम करणार नाहीत त्यांना जनताच धडा शिकवेल, असे सुरेश म्हणत असे. पण तो कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे त्याच्या एका नातेवाईकाने सांगितले.

VIDEO: रोड शोमध्ये तरुणाने अरविंद केजरीवालांच्या श्रीमुखात लगावली

First published: May 4, 2019, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading