मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुरेश रैनाच्या भावानेही गमावला जीव; पंजाबात झाला होता घरावर हल्ला

सुरेश रैनाच्या भावानेही गमावला जीव; पंजाबात झाला होता घरावर हल्ला

IPL 2020 मध्ये CSK संघाकडून खेळण्यासाठी गेलेला सुरेश रैना (Suresh Raina) दुबईहून परत आला. त्याच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला आणि आता उपचारादरम्यान रैनाच्या आत्तेभावाचाही जीव गेला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाकडून खेळण्यासाठी गेलेल्या सुरेश रैना (Suresh Raina) याच्या पंजाबातील कुटुंबीयांवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्याच्या काकांचा मृत्यू झाला होता आणि आत्या, आत्तेभाऊ गंभीर जखमी होते. आता उपचारादरम्यान रैनाच्या भावाचाही जीव गेला आहे. IPL 2020 साठी दुबईला गेलेला सुरेश रैना कौटुंबिक कारणामुळे UAE हून भारतात परतला होता. त्यामागे हा भीषण हल्ला हेच कारण होतं. रैनाच्या जवळच्या नात्यातील काही व्यक्तींवर पठाणकोट इथल्या त्यांच्या घरात अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.अद्याप हल्लेखोरांचा पत्ता लागू शकलेला नाही. सुरेश रैनाने पंजाब पोलिसांना हल्लेखोरांना शोधून काढावं यासाठी आवाहनही केलं होतं. रैनाच्या कुटुंबातील दोघांचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर आणखी काही जण जखमी आहेत. सुरेश रैनाने आतापर्यंत याविषयी जाहीरपणे काही सांगितलं नव्हतं. मंगळवारी मात्र त्याने Tweet करून आपला भाऊही आपण गमावल्याचं सांगितलं. अजूनही त्या रात्री नेमकं काय झालं आम्हाला माहिती नाही. किमान ते तरी आम्हाला कळलंच पाहिजे. हल्लेखोरांना कृपया शोधा आणि त्यांना असे आणखी गुन्हे करण्यापासून रोखा, असं सुरेश रैनाने सोशल मीडियावर लिहिलं आहे. पठाणकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर 19 ऑगस्टच्या मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. हे कुटुंब आपल्या घराच्या गच्चीवर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला असून काकू आशा देवी या गंभीर जखमी झाल्या. सध्या आशा देवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्या मृत्यूशी झुंज देत असल्याचं समजते. चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैना आयपीएलसाठी मोठी मेहनत घेत सराव करत होता. 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रैनाचं पूर्ण लक्ष आता आयपीएलवरच होतं. रैनाच्या आक्रमक फलंदाजीचा सीएसकेला चांगलाच फायदा झाला असता. मात्र कौटुंबिक कारणामुळे सुरेश रैना माघारी परतल्याने संघाला धक्का बसला आहे.
First published:

Tags: Suresh raina

पुढील बातम्या