पियुष गोयल देशाचे नवे रेल्वेमंत्री

पियुष गोयल देशाचे नवे रेल्वेमंत्री

सतत झालेल्या रेल्वे अपघातांमुळे व्यथित झालेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे खात्याचा कारभारातून स्वत : ला मुक्त करून घेतलंय.

  • Share this:

03 सप्टेंबर :  सतत झालेल्या रेल्वे अपघातांमुळे व्यथित झालेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे खात्याचा कारभारातून स्वत : ला मुक्त करून घेतलंय. सुरेश प्रभूंनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी पियुष गोयल यांची वर्णी लागली आहे.

मागील महिन्यात  लागोपाठच्या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. पण पंतप्रधानांनी त्यांनी घाई करू नका, वाट बघा, असा सल्ला दिला होता.

आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय. पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन आणि धर्मेंद्र प्रधान यांना बढती देण्यात आली. शपथविधी सोहळा संपल्यानंतर काही मिनिटातच सुरेश प्रभूंनी टि्वट करून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी सुरेश प्रभू भावूक झाले. त्यांनी रेल्वे खात्यातील 13 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांने आभार मानले, तुमच्यासोबत काम करण्याची प्रत्येक आठवण माझ्या मनात राहील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

First published: September 3, 2017, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading