आता विशाखापट्टणम ते अरकू करा नयनरम्य प्रवास...

आता विशाखापट्टणम ते अरकू करा नयनरम्य प्रवास...

  • Share this:

17 एप्रिल : सुट्टीत भारतात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून भारतीय रेल्वेचा चेहरा बदलतोय. भारतातही आता रेल्वे प्रवास नयनरम्य झाला आहे.

सुहाना सफर और ये मौसम हसी, असा काहीसा अनुभव आता आपल्याला रेल्वे प्रवासातून अनुभवायला मिळणार आहे. आपण ही जी रेल्वे पाहताय ती स्वित्झर्लंड किंवा जपानमधली नाही. तर ही भारतातीलच रेल्वे आहे. विशाखापट्टणम ते अरकूदरम्यान प्रवासात नयनरम्य निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल काचेचे छत असणारे डबे असलेल्या रेल्वेचे लोकार्पण केलं.

या रेल्वेची वैशिष्ट्ये :

विस्टाडोम कोच अशी ओळख

काचेचे छत

फिरती आसनं

सर्व डबे वातानुकूलित

जीपीएस आधारित सूचना यंत्रणा

4 विस्टाडोम कोचला 4 कोटींचा खर्च

सध्या या डब्यांची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरु आहे. यातील दोन डब्यातून जम्मू-काश्मीरमधील दरीखोऱ्यांचं आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्रातील कोकणातही पर्यटनाला चालना मिळण्यासाठी असे काचेचे डब्बे आले तर सोने पे सुहागा ठरेल. सह्याद्रीच्या डोंगररांगा, नद्या, संथ लयीत वाहणारे बॅक वॉटर्स, हिरवीगर्द झाडी, लांबलचक समुद्रकिनारा ही कोकणची वैशिष्टये पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करतात. कोकणच्या याच निसर्ग सौदर्याचा लाभ उठवत पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी कोकण मार्गावर काचेच्या डब्यांची योजना लवकर यावी ही अपेक्षा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 08:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading