सुरत, 13 जानेवारी: सुरतमधील महिलेचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. करवा चौथच्या दिवशी या महिलेच्या पतीनेच हा डान्स चित्रित केला होता. पतीने सहजच काढलेला हा डान्स व्हिडिओ आता मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. लोकांकडून मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर केला जात असून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.