100 तरुणींची कपडे काढून केली टेस्ट, महापालिकेत घडला धक्कादायक प्रकार

100 तरुणींची कपडे काढून केली टेस्ट, महापालिकेत घडला धक्कादायक प्रकार

महिला डॉक्टरांना किळसवाणा प्रकार, तरुणींना अश्लील प्रश्न विचारत केली वादग्रस्त कौमार्य चाचणी.

  • Share this:

सुरत, 21 फेब्रुवारी : दोन दिवसांपूर्वी भूज येथील महाविद्यालयात विद्यार्थीनींना मासिक पाळी नाही ना याचा पुरावा देण्यासाठी त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडले होते. या सगळ्या प्रकारानंतर साऱ्या देशात खळबळ माजली होती. आता सुरत महानगरपालिकेत असाच एक धक्कादायक प्रकार घडला. गुरुवारी सुरतच्या पालिकेत क्लार्क म्हणून काम करत असलेल्या तरुणीला सरकारी रुग्णालयात महिला डॉक्टरांनी नग्न अवस्थेत उभे केले. एवढेच नाही तर या तरुणीला खाजगी प्रश्नही विचारले. या सगळ्या प्रकारानंतर या तरुणीने डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली.

गुरुवारी पालिकेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यास सांगितल्या होत्या. मात्र सरकारी रुग्णालयात एकाच वेळी महिला डॉक्टरांनी 100 महिला कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी त्यांना तपासणीसाठी कपडे काढा असे सांगत, 10 महिलांना एकाच खोलीत नग्न अवस्थेत उभे केले. एवढेच नाही तर या डॉक्टरांनी दरवाजेही नीट बंद केले होते. महिला कर्मचाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरून टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला ही माहिती दिली.

वाचा-पुणे: पतीने घेतला पत्नीच्या मनगटाचा चावा, कोर्टाने दिली घटस्फोटाला मंजूरी

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, या महिला कर्मचाऱ्यांची कौमार्य चाचणी केली जात होती. महिला डॉक्टरांनी काही तरुणींना, तुम्ही गरोदर आहात का असे प्रश्नही यावेळी विचारले. काही तरुणींनी आपल्या तक्रारीत महिला डॉक्टरांनी उलट-सुलट प्रश्न विचारल्याचेही सांगितले आहे. सरकारी नियमांनुसार, कर्मचाऱ्यांची भर्ती झाल्यानंतर आरोग्य चाचणी करणे बंधनकारक असते.

वाचा-महाशिवरात्रीच्या यात्रेला नराधमाने मुलीची काढली छेड, नागरिकांनी दिला बेदम चोप

महिलांना विचारले अश्लील प्रश्न

एका अधिकाऱ्याने सांगितले की ज्या खोलीत महिलांना अशा स्थितीत उभे राहण्यास सांगितले, त्या खोलीचा दरवाजादेखील बंद केला नव्हता. खोलीत एकच पडदा होता. यातच तरुणींची विवादास्पद कौमार्य चाचणी व्यतिरिक्त, स्त्रियांबद्दलही अश्लील प्रश्नही विचारण्यात आले. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख अश्विन वाछानी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला, “रुग्णालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महिलांची शारीरिक तपासणी करणे अनिवार्य आहे. ते म्हणाले की पुरुषांद्वारे अशी तपासणी केली जाते की नाही हे त्यांना माहिती नाही परंतु महिलांच्या बाबतीत आपण हे नियम पाळले पाहिजेत आणि एखाद्या महिलेला कोणत्याही प्रकारचा आजार आहे का ते तपासून पाहावे लागेल”, असे सांगितले. एवढेच नाही तर विवादास्पद कौमार्य चाचणी केल्याबद्दल महिला डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

वाचा-Sex बाबत मुलांशी बोलण्यास उशीर नको; पालकांनो, मनमोकळं बोलण्याची हीच ती योग्य वेळ

‘डॉक्टरांनी केली वादग्रस्त कौमार्य चाचणी’

कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस एए शेख यांनी, “नव्या कर्मचाऱ्यांची भर्ती झाल्यानंतर त्यांची आरोग्य चाचणी केली जाते. मात्र तरुणींना असे प्रश्न विचारने लज्जास्पद आहे. यामुळं त्यांच्या मनावर वाईट परिणाम होते. कौमार्य चाचणी हा त्यांचा अपमान आहे. मी आजवर अशी चाचणी केल्याचे कधीच ऐकले नाही”, असे सांगत महिला डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

First published: February 21, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading