मेहुल चोकसीने PM मोदींवर पूर्ण केली पीएचडी, समोर आला हा निष्कर्ष

मेहुलने मोदींच्या नेतृत्वावर पीएचडी केली आहे. त्यातून मोदींच्या नेतृत्वगुणांबद्दल काही निष्कर्ष समोर आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 12:45 PM IST

मेहुल चोकसीने PM मोदींवर पूर्ण केली पीएचडी, समोर आला हा निष्कर्ष

गुजरातमधील एका विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पीएचडी पूर्ण केली आहे. पंतप्रधान मोदींवर पीएचडी करणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव मेहुल चोकसी असे आहे. हे नाव कर्ज बुडवून पळून गेलेल्या हिरे उद्योजक मेहुल चोकसीच्या नावाशी साधर्म्य साधणारे आहे.

मोदींवर पीएचडी करणाऱ्या मेहुलने वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्याने Leadership under Government - Case Study of Narendra Modi या विषयावर पीएचजी केली.

मेहुलने याबाबत सांगितले की, पंतप्रधानांवर पीएचडी करण्यासाठी  450 लोकांची मुलाखत घेतली. यात सरकारी अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी आणि नेत्यांचा समावेश होता.

Loading...

पीएचडी पूर्ण करण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. यात 32 प्रश्न विचारले होते. यातून 25 टक्के लोक मोदींच्या भाषणाला चांगले म्हणतात. तर 48 टक्के लोकांना मोदींचे पॉलिटिकल मार्केटिंग चांगलं असल्याचे वाटतं असं समोर आलं आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या मेहुल यांनी 2010 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पीएचडीला सुरूवात केली होती.  पीएचडीमध्ये सुरुवातीला मोदींच्या यशस्वी नेतृत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत.

त्यामध्ये 51 टक्के लोकांनी सकारात्मक तर 34.25 टक्के लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय 46.75 टक्के लोकांनी लोकप्रियतेसाठी नेत्याने जनतेच्या फायद्याचे निर्णय घ्यावेत असं म्हटलं आहे.

मेहुल म्हणाला की, 81 टक्के लोकांना देशाचा पंतप्रधान होण्यासाठी सकारात्मक नेतृत्व गरजेचं असणं महत्त्वाचं असल्याचं वाटतं. तर 31 टक्के लोकांना प्रामाणिकपणा तसेच पारदर्शकता असावी असं वाटतं.

पंतप्रधान मोदींवर पीएचडी करणं आव्हानात्मक होतं असं मेहुलने म्हटलं आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत लिहणं कठीण असतं. हे लोकांपर्यंत पोहचवणं आणि त्यावर प्रतिक्रिया मागवणं हेदेखील एक आव्हानच होते असं मेहुल म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...