सूरत, 16 नोव्हेंबर : गुजरातच्या सुरतमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वाहन थांबवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला 25 किमीपर्यंत पिक अप वॅनच्या बोनेटवर खेचत नेले. अपहरण आणि जीव धोक्यात टाकल्याबद्दल पीकअप व्हॅनच्या चालकासह सात जणांविरोधात नवसारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी कॉन्स्टेबल गणेश चौधरी आणि किशन गोविंद हे नवसारी रेल्वे स्थानक परिसरात ड्यूटीवर होते. त्यावेळी त्यांनी नवसारी शहरातील हॉटेल अशोकाजवळील एक पिकअप व्हॅन थांबविली आणि ड्रायव्हरला गाडीचे कागदपत्रे दाखवायला सांगितले.
वाचा-जीवघेण्या हल्ल्यातून गायीने मालकाची अशी केली सुटका, VIDEO पाहून बसेल धक्का!
ड्रायव्हर कागदपत्रे न दाखवल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गणेश चौधरी यांनी गाडीतील एका प्रवाश्याला पकडलं आणि चौधरी गाडीच्या बोनेटवर चढले. असे असतांनाही गाडीतील चालकांनी पोलीस अधिकाऱ्यासह राष्ट्रीय महामार्ग 48 वर गाडी चालवत पुढे नेले. पोलिसांनी सांगितले की, पलसाना तालुक्यातील बालेश्वर गावात पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक लावला, त्यामुळे कॉन्स्टेबल खाली पडले. पिकअप व्हॅन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाचा-धक्कादायक! न्यायाधीशांनी सरकारी बंगल्यात साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या
पोलिसांनी नवसारी शहर पोलीस ठाण्याजवळील पिकअप व्हॅनच्या चालकासह सात जणांविरूद्ध तक्रार नोंदवली आहे. नवसारीचे पोलीस उपनिरीक्षक तरुण कुमार पटेल म्हणाले की, 'चौधरी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सोडण्यात आले आहे. वाहन नोंदणीच्या आधारे आम्ही घटनेत सामील असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.