Home /News /national /

गुजरात महानगरपालिका निवडणुकीत 'आप'नं खातं उघडलं, भाजपला टक्कर तर काँग्रेसला मोठा धक्का

गुजरात महानगरपालिका निवडणुकीत 'आप'नं खातं उघडलं, भाजपला टक्कर तर काँग्रेसला मोठा धक्का

Gujarat Municipal Election Live Updates: सूरत महानगरपालिका निवडणूकीत (Surat Municipal Election) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि आम आदमी पार्टी यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. तर, काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसवर तिसऱ्या नंबरवर घसरलं आहे.

पुढे वाचा ...
    अहमदाबाद 23 फेब्रुवारी : गुजरातच्या राजकारणात मंगळवारी एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला आहे. राज्यातील सूरत महानगरपालिका निवडणूकीत भाजपला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. तर काँग्रेसला याठिकाणी मोठा झटका बसला आहे. तर, आप पक्षानं आपल्या एन्ट्रीनं सगळ्यांचा आर्श्चयाचा धक्का दिला आहे. गुजरातमधील या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा गृहप्रवेश झाला आहे. सूरतमधील 108 जागांपैकी आपनं 8 जागांवर विजय मिळवला आहे. सूरत महानगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. तर, काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसवर तिसऱ्या नंबरवर घसरलं आहे. यामुळे गुजरातमध्ये आम आदमी पार्टीनं आपलं खातं खोललं आहे. सूरत महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील चारही जागा आणि प्रभाग क्रमांक 4 च्या चारही जागांवर आम आदमी पक्षानं विजय मिळवला आहे. 120 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आप भाजपला टक्कर देताना दिसत आहे. भाजपनं आतापर्यंत 16 जागांवर विजय मिळवला आहे. सध्याची परिस्थिती - भाजप - 32 जागांवर विजयी काँग्रेस - 0 जागांवर विजयी आप - 8 जागांवर विजयी Live Results: Gujarat Municipal Corporation Elections 2021  भाजप - 40 जागांवर आघाडीवर काँग्रेस -10 जागांवर आघाडीवर आप- 10 जागांवर आघाडीवर
    First published:

    Tags: AAP, BJP, Congress, India, Modi government, PM narendra modi

    पुढील बातम्या