धक्कादायक! जेवणावरून संपवलं जीवन, तिखट जास्त झालं म्हणून पतीची आत्महत्या

पती पत्नीमध्ये जेवणाच्या चवीवरून वाद झाला. त्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2019 07:27 AM IST

धक्कादायक! जेवणावरून संपवलं जीवन, तिखट जास्त झालं म्हणून पतीची आत्महत्या

सुरत, 9 नोव्हेंबर : पती-पत्नींमध्ये होणारे वाद हे काही नवीन नसतात. कोणत्याही किरकोळ काऱणावरून ते होऊ शकतात. पण कधी या वादामुळे टोकाचं पाऊल उचललं जाण्याची शक्यता असते. आता सुरतमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासाठी कारण होते ते पत्नीने भाजीमध्ये जास्त मसाला वापरला यावरून झालेला वाद.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरतमधील दिंडोलीतील शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या कैलास गणेशभाई महाजान यांनी पत्नीशी झालेल्या वादानंतर टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी रात्री त्यांचा भाजी जास्त तिखट आणि मसालेदार झाल्यावरून पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर दोघांमधील वादातून किरकोळ मारहाणीचा प्रकारही झाला. या भांडणानंतर कैलास यांनी आत्महत्या केली.

आत्महत्या केलेल्या कैलास हे रिक्षा चालवून कुटुंब चालवत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. पत्नीसोबत झालेला वाद सहन न झाल्यानं त्यांनी घरातील छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

वकिलांनी महिला पोलिसावरही केला हल्ला, पाठलाग करून केली मारहाण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: suicide
First Published: Nov 10, 2019 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...