क्लासमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी तरूणानं घेतली आगीत उडी; पण...

सुरतमधील आगीत तरूणानं धाडक दाखवत 2 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 09:27 AM IST

क्लासमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी तरूणानं घेतली आगीत उडी; पण...

पुणे, 25 मे : सुरतमधील तक्षशीला कॉम्प्लेक्सला शुक्रवारी लागलेल्या आगीत 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये 18 जण जखमी झाले आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर अहमदाबादमधील कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा काही लोक व्हिडीओ शुट करत होते. पण, या गर्दीतील केतन जोरवाडीया नावाच्या तरूणानं आगीत उडी घेत 2 विद्यार्थ्यांचाजीव वाचवला. केतनचं हे धाडस पाहून आणखी काही लोक पुढे येत त्यांनी देखील मदतीसाठी धाव घेतली. यावेळी केतननं दोन विद्यार्थ्यांचा जीव वाचवला. पण, आणखी विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यात अपयश आल्याचं दु:ख केतनला आहे. केतनच्या या साहसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या आगी मागील कारणांचा शोध सध्या सुरू आहे. देशात देखील दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.काय आहे घटना

सुरत शहरात शुक्रवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.तब्बल एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.

Loading...मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत नागरिकांच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेत मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला सर्व सहकार्य करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


VIDEO: नायर रुग्णालयात रॅगिंगला कंटाळून ट्रेनी डॉक्टरची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 09:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...