Pulwama attack : मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द करत हिरे व्यापारी करणार 11 लाख दान

Pulwama attack : मुलीच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द करत हिरे व्यापारी करणार 11 लाख दान

पुलवामा येथील हल्ल्यानंतर सुरत येथील हिरे व्यापाऱ्यानं मुलीच्या लग्नाचं रिसेप्सन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

सुरत, 16 फेब्रुवारी : गुरूवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी बंद ठेऊन, मोर्चे काढून हल्ल्याचा निषेध केला जात आहे. शिवाय, 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देत दहशतवाद्यांचा खात्मा करा अशी मागणी होत आहे. या हल्ल्यानंतर सारा देश शोकसागरात बुडाला आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. काहींना तर अश्रू देखील अनावर झाले. पण, साऱ्या बाबी घडत असताना सुरतमधील हिरे व्यापाऱ्यानं एक आदर्श असा निर्णय घेतला आहे. या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या मुलीचं लग्नानंतरचं रिसेप्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, 11 लाखांची रक्कम ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात गेला आहे.

कोण आहे व्यापारी?

देवशी माणेक असं या हिरे व्यापाऱ्याचं नाव आहे. देवशी यांच्या अमी या मुलीचं शुक्रवारी लग्न झालं. त्यानंतर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, देवशी यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यानंतर रिसेप्शन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रकारची सुचना त्यांनी आपल्या मित्र परिवाराला देखील पाठवली. यासंदर्भातील एक पत्र आता व्हायरल देखील झालं आहे. यामध्ये 'पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर माझ्या मुलीचं लग्न साध्या सोप्या पद्धतीनं होईल. त्यामध्ये कोणताही डामडौल नसेल. शिवाय, रिसेप्शन देखील रद्द करण्यात आल्याचं' म्हटलं आहे. त्यानंतर 11 लाखांची रक्कम ही शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

पुलवामामध्ये 44 जवान शहीद

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर सध्या संताप पाहायाला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना दिला आहे. जैश - ए - मोहम्मद या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

VIDEO - 'शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', मोदींचं UNCUT भाषण

First published: February 16, 2019, 2:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading