...तर टीकटॉकवरची बंदी मागे घेऊ - सर्वोच्च न्यायालय

...तर टीकटॉकवरची बंदी मागे घेऊ - सर्वोच्च न्यायालय

टॉकटॉकवरील बंदी हटणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : टीकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवर मद्रास हायकोर्टानं बंदी घातली. त्यानंतर अ‍ॅड्राईड आणि isoमधून देखील टीकटॉक अ‍ॅप हटवलं गेलं. पण, मद्रास हायकोर्टाच्या या निर्णयाला आता चीनी कंपनी Bytedance Technologyनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र सध्या हे प्रकरण मद्रास हायकोर्टात आहे. त्यामुळे त्यावर आता निर्णय घेतला जाणार नाही असा निर्णय दिला आहे. त्यासाठी 24 एप्रिलपर्यतची मुदत देण्यात आली आहे. परिणामी, टीकटॉकवरील बंदी हटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार हे देखील पाहावं लागणार आहे.


Bharat Trailer- हर मुस्कुराते चेहरे के पीछे एक दर्द छिपा होता है.. वो ही दर्द आपको जिंदा रखता है...


या गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

टीकटॉकचं सुरूवातीचं नाव हे musically असं होतं. त्यानंतर त्याचं नाव बदलून टीकटॉक असं ठेवलं गेलं. एका रिपोर्टनुसार जवळपास 100 कोटीपेक्षा देखील जास्त लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केलं आहे. स्टार्टअपमध्ये सर्वाधिक स्टार्ट अप किंमत असेलेली कंपनी अशी टीकटॉकची ओळख आहे.


अक्षय कुमारने शेअर केला फोटो, तब्बल सहा वर्षांनंतर या अभिनेत्रीसोबत केलं काम


काय आहे नेमके प्रकरण?

टिक टॉक हे चीनमधील Bytedance Technology या कंपनीचे अ‍ॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ बनवण्यात येत असून त्यामुळे देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत टिक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं बंदीचा आदेश दिला होता.

टिक टॉक अ‍ॅपच्या मदतीने काही सेकंद/मिनिटांचे व्हिडीओ तयार करून त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. याची प्रचंड क्रेझ सध्या सोशल मीडियावर आहे.


VIDEO: पुणे-सोलापूर मार्गावर खासगी बसनं घेतला अचानक पेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 04:21 PM IST

ताज्या बातम्या