काँग्रेसला सत्तेपासून रोखून भाजपबरोबर राज्य करणाऱ्या या नेत्याचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन... Twitter वर झाल्या ट्रोल

काँग्रेसला सत्तेपासून रोखून भाजपबरोबर राज्य करणाऱ्या या नेत्याचं सुप्रिया सुळेंनी केलं अभिनंदन... Twitter वर झाल्या ट्रोल

भाजपच्या जवळच्या प्रादेशिक नेत्याचं अचानक अभिनंदन केल्यामुळे सुप्रिया सुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचं एक Tweet चर्चेचा विषय ठरत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : राज्यात भाजपविरोधात शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकवटले आहेत. भाजपवर टीका करण्याची कुठलीही संधी हे तीनही पक्ष सोडताना दिसत नाहीत. अशात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी मात्र हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचं एक Tweet त्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हरियाणात भाजपबरोबर सत्तास्थापनेची गणितं जुळवत उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या दुष्यंत चौटाला यांचं सुप्रिया सुळे अचानक कशासाठी अभिनंदन करत आहेत हे न उमजून अनेक ट्विटर यूजर्सनी प्रश्न विचारले आहेत. काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. सुळे यांच्या ट्वीटमध्ये इतर कुठलाही तपशील नाही. फक्त एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये त्या जननायक जनता पार्टीच्या दुष्यंतसिंह चौटाला यांच्यासमवेत दिसत आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातल्या निवडणुकीबरोबरच झाली. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तरीही, एकत्र निवडणूक लढलेले हे पक्ष विभक्त झाले आणि महाराष्ट्रात सत्तास्थापनेची पोकळी निर्माण झाली. कुठल्याच एका पक्षाला बहुमत नव्हतं. तशीच परिस्थिती हरियाणात होती. काँग्रेस आणि भाजप यांच्यात सत्तास्थापनेसाठी चढाओढ होती. महाराष्ट्रात जसं सत्तास्थापनेची दोरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती होती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवणारा पक्ष सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती होती. तशीच हरियाणात दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाचं स्थान होतं. फक्त 10 जागा मिळवूनसुद्धा दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरले.

सुप्रिया सुळेंनी निसतं अभिनंदन केलेलं नाही, तर Proud of You असंही लिहिलं आहे. काँग्रेसला सत्तेपासून रोखून भाजपला साथ देणाऱ्या चौटाला यांचा अभिमान सुप्रिया सुळेंना कसाकाय वाटायला लागला, हे कळायला मार्ग नाही. कारण या ट्वीटमध्ये कुठलीही इतर माहिती लिहिलेली नाही.

सुप्रिया सुळेंच्या या Tweet नंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. काहींनी सुळे यांना ट्रोल केलं.

अनेकांनी अभिमान कशाचा वाटतो, असा सवाल केला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 06:20 PM IST

ताज्या बातम्या