महिलांना बॉसचा फोन नाकारण्याचा अधिकार द्या, सुप्रिया सुळे लोकसभेत मांडणार विधेयक

महिलांना बॉसचा फोन नाकारण्याचा अधिकार द्या, सुप्रिया सुळे लोकसभेत मांडणार विधेयक

सुप्रिया सुळे या मांडत असलेलं हे खासगी विधेयक जर सरकारने स्वीकारलं तर महिलांना आपल्या कामाव्यतिरिक्तच्या वेळेत वरिष्ठांचा फोन नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जानेवारी : कामावर जाणाऱ्या महिलांसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत एक महत्त्वपूर्ण विधेयक मांडणार आहेत.जर आपला बॉस कार्यालयीन वेळेनंतर ई-मेल किंवा फोन करत असेल तर त्याला नाकारण्याचा अधिकार मिळावा, यासाठी सुप्रिया सुळे विधेयक मांडणार आहेत.

सुप्रिया सुळे या मांडत असलेलं हे खासगी विधेयक जर सरकारने स्वीकारलं तर महिलांना आपल्या कामाव्यतिरिक्तच्या वेळेत वरिष्ठांचा फोन नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिला कामावर जातात त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे विधेयक?

कार्यालयीन वेळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशी कार्यालयाच्या कामाकरिता जर आपला कार्यालयप्रमुख फोन किंवा ईमेल करीत असेल तर तो नाकारण्याचा अधिकार मिळावा, अशी विधयेकात तरतुद करण्यात आली आहे. कर्मचारी कल्याण कायद्यामध्ये असा बदल करण्याची देखील मागणी या खासगी विधेयकात करण्यात आली आहे.

का मांडलं जात आहे असं विधेयक?

अलिकडच्या काळात महिलादेखील मोठ्या प्रमाणात कामासाठी बाहेर पडू लागल्या आहेत. परंतु त्यासोबतच कामाच्या ठिकाणी महिलांचं होणारं शोषण, ही समस्या देखील तयार झाली. अनेकदा वरिष्ठांकडून महिलांचा लैंगिक अथवा मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे या विधेयकातून अशा प्रकारांना काही प्रमाणात का होईना आळा बसण्याची शक्यता आहे.

VIDEO: फेसबुकवरून राज ठाकरेंवर टीका, मनसैनिकांनी घरी जाऊन दिली शिक्षा

First published: January 4, 2019, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading