आता रक्त, डीएनए आणि युरीन सॅम्पलही आधारशी जोडणार का? -सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल

आधार कार्डच्या संविधानिक वैधतेवरच सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2018 06:24 PM IST

आता  रक्त, डीएनए आणि युरीन सॅम्पलही आधारशी जोडणार का? -सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल

05 एप्रिल:  सरकारच्या आधार लिंकीग मोहीमेवर सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत. मोबाईल ,पासपोर्ट, रेशन कार्ड यानंतर  रक्त ,युरीन सॅम्पल  आणि डीएनएही आधारशी जोडणार का असा सवालच सुप्रीम कोर्टात न्यायाधिशांनी सरकारला विचारला आहे.

आधार कार्डच्या संविधानिक वैधतेवरच सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. लोकांचा वैयक्तिक हक्कांचं हनन होऊ नये अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ याप्रकरणी सुनावणी करते आहे. आधार कार्डला नक्की किती हक्क संसदेत दिले गेले आहे? लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यात तो कसा ढवळाढवळ करू शकतो असे अनेक  प्रश्नच आधार कार्डबद्दल सुप्रीम कोर्टात विचारले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे सरकारकडून अॅटोर्नी जनरलने   आधार नाही पण यासम काहीतरी भविष्यात खरोखरच डीएनए ,युरीन, रक्त सॅम्पलशी जोडले जाऊ शकते अशी माहिती दिली आहे.

दरम्यान बॅँक अकाउंट्सशी आधार कार्ड जोडण्याबाबतीतही सुप्रीम कोर्टाचा सूर नकारात्मकच होता.  बॅंक अकाऊंटशी आधार जोडल्यामुळे बॅंकांमधील फ्रॉड थांबणार नाहीत असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. त्यासाठी भ्रष्टाचार संपवणं हीच प्राथमिकता आहे असं ठामपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2018 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...