सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व धोक्यात आलंय-न्यायमूर्ती कुरिअन यांचंं सरन्यायाधीशांना पत्र

सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व धोक्यात आलंय-न्यायमूर्ती कुरिअन यांचंं सरन्यायाधीशांना पत्र

हे सगळं प्रकरण आहे एक वकील आणि उत्तराखंड हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या सुप्रीम कोर्टात नियुक्तीचा. दोघांच्या नेमणुकीची शिफारस सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमनं फेब्रुवारीतच केली होती

  • Share this:

12 एप्रिल:  सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारमधले मतभेद दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. न्यायमूर्तींच्या नेमणुकीवरून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलंय..  या पत्रात  सुप्रीम कोर्टाचं अस्तित्वच  धोक्यात आलंय अशा  शब्दात आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी तीन न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरूद्ध संप केला होता. पत्रकार परिषद घेऊन ते जाहीरही केलं होतं.न्यायमूर्ती कुरिअन जोसेफ त्या तीन न्यायमूर्तींपैकी एक आहेत.

पण त्यावर कायदा मंत्रालयानं अजूनही पाऊल उचललेलं नाही.  यामुळे नाराज झालेल्या कुरियन यांनी हे पत्र लिहिलंय.

हे सगळं प्रकरण  आहे एक वकील आणि उत्तराखंड हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या सुप्रीम कोर्टात नियुक्तीचा. दोघांच्या नेमणुकीची शिफारस सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमनं फेब्रुवारीतच केली होती

आपल्या पत्रात कुरिअन म्हणतात,की   सुप्रीम कोर्टाचं अस्तित्वच धोक्यात आलंय. कोलेजियमनं केलेल्या शिफारसींवर केंद्र सरकार नुसतं बसून आहे. या अभूतपूर्व घटनेवर कोर्टानं प्रतिक्रिया दिली नाही तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.  3 महिन्यांनंतरही सुप्रीम कोर्टाच्या शिफारसींचं काय झालं, हे कळायला काहीच मार्ग नाही. हे या कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलंय. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं सुओ मोटो दखल घ्यावी. 9 महिने उलटूनही जर नैसर्गिक प्रसूती झाली नाही तर सिझेरीअन करावंच लागतं. नाहीतर मूल गर्भाशयातच मरण पावतं. कोलेजियमच्या शिफारशींवर निर्णय न घेणे हा निव्वळ सत्तेचा गैरवापर आहे. यामुळे सर्व न्यायाधीशांना हा संदेश जातो की, केंद्र सरकारची नाराजी ओढावणारे निर्णय देऊ नये. यानं न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरच गदा येत नाही का ?

आता या पत्रावर  सुप्रीम कोर्ट काय उत्तर देतं आणि केंद्र सरकार काय प्रतिक्रिया देतं

First published: April 12, 2018, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading