Elec-widget

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलीज होणार की नाही? सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलीज होणार की नाही? सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या रिलीजसंदर्भात सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. निवडणूक आयोगानं 19 मे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानापर्यंत या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 12 एप्रिलला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार होता. मात्र विरोधकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक आयोगानं सिनेमाच्या रिलीज होऊ दिला नाही.

निवडणूक आयोगानं सोमवारी (22 एप्रिल) सिनेमासंबंधित आपला अहवाल सीलबंद लिफाफ्याद्वारे सुप्रीम कोर्टात सोपवला. सुप्रीम कोटाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाच्या टीमसाठी सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. सात निवडणूक अधिकाऱ्यांनी पीएम मोदींचा बायोपिक पाहिला आणि आपला सीलबंद अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान सिनेमा रिलीज झाला तर एका विशिष्ठ राजकीय पक्षाला याचा फायदा होईल, असे मत निवडणूक अधिकाऱ्यांनी सिनेमा पाहिल्यानंतर नोंदवलं. दरम्यान, आज सिनेमाच्या रिलीजवर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय सांगणार आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

वाचा अन्य बातम्या

Loading...

नरेंद्र मोदी, राज ठाकरेंसह महाराष्ट्रात राहुल गांधींची तोफ धडाडणार, प्रचार शिगेला

सावधान! ATM मधून कॅश काढण्याआधी चेक करा या गोष्टी; नाहीतर रिकामं होईल खातं

SPECIAL REPORT: मोदींचा रोड शो उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणं बदलणार?

SPECIAL REPORT: शिर्डीत पाऊल ठेवण्याआधी राहुल गांधींचं 'सर्जिकल स्ट्राईक', कार्यकर्त्यांची जिंकली मनं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...