भाजपला हवा 'षटकार' अन्यथा आणखी एक राज्य गमवावे लागेल!

भाजपला हवा 'षटकार' अन्यथा आणखी एक राज्य गमवावे लागेल!

कर्नाटकात पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 13 नोव्हेंबर: कर्नाटकात पक्ष बदलणाऱ्या आमदारांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. कोर्टाने बंडखोरी करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवणारा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. पण त्याच बरोबर या आमदारांना पोटनिवडणू्क लढवता येणार असल्याचे सांगत दिलासा देखील दिला आहे. राज्यातील 17 पैकी 15 ठिकाणी 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. अन्य दोन ठिकाणी म्हणजेच मस्की आणि राजराजेश्वरी संदर्भातील याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपचे टेन्शन वाढले आहे.

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षातील 17 आमदारांनी बंडखोरीकरत स्वत:चेच सरकार पाडले होते. विधानसभेतील विश्वास मत ठराव जिंकण्यात अपयशी ठरलेल्या कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्यातील तेव्हाच्या राजकीय गोंधळात विधानसभेच्या अध्यक्षांनी 17 आमदारांना अपात्र ठरवले होते. या आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे भाजपला सत्ता मिळवला आली होती. विधानसभेची सदस्य संख्या 224 इतकी आहे पण या आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे ती संख्या 207 झाली आणि बहुमत मिळवण्यासाठी 104 आमदारांचे संख्याबळ पुरेसे होते. तेव्हा भाजपकडे 106 आमदार होते. या राजकीय घडामोडीमुळे भाजपला कर्नाटकमध्ये सत्ता मिळवता आली होती.

आता राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. ज्या 15 जागांवर निवडणूक होत आहे त्यामुळे विधानसभेतील सदस्यांची संख्या वाढणार आहे आणि पर्यायाने बहुमतासाठीचे संख्याबळ देखील वाढेल. अशा परिस्थितीत भाजपला पोटनिवडणुकीत विजय मिळवणे गरजेचे आहे. आगामी पोटनिवडणुकीतील 15 पैकी किमान 6 जागांवर भाजपला विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्या विधानसभेतील 207 पैकी भाजपकडे 106 जाा आहेत. 207मध्ये 15 जागांचा समावेश झाल्यास सदस्य संख्या 222 इतकी होईल आणि भाजपला बहुमतासाठी 112 आमदार लागतील.

ज्या 15 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत त्यापैकी 3 ठिकाणी जेडीयू आणि 12 ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते. आता पोटनिवडणुकीत भाजप या बंडखोरांनाच पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही सर्व 15 ठिकाणी विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published by: Akshay Shitole
First published: November 13, 2019, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading