'त्या' 17 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या मोठा दिलासा

'त्या' 17 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाच्या मोठा दिलासा

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या दोन पक्षातील 17 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या दोन पक्षातील 17 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या 17 आमदारांना आगामी पोटनिवडणूक लढवता येईल असा निर्णय न्यायालयाने दिला. पण त्याचवेळी कोर्टाने कर्नाटकच्या तत्कालीन अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. हा निर्णय देताना कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की अपात्रता अनिश्चित काळासाठी असू शकत नाही.

कर्नाटकमधील 17 बंडखोर आमदारांच्या याचिकेवरील निकाल न्यायालयाने 25 ऑक्टोबर रोजी सुरक्षित ठेवला होता. या आमदारांनी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष के.आर.रमेश कुमार यांच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल केली होती. कुमार यांनी या 17 आमदारांना अपात्र ठरवले होते. संबंधित आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे राज्यात 17 पैकी 15 जागांवर 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. या याचिकेत आमदारांनी 5 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक थांबवण्याची मागणी केली होती. जोपर्यंत यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत पोटनिवडणुका होऊ नयेत, असे आमदारांचे मत होते. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय या 15 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये अशी विनंती आमदारांनी आयोगाकडे केली होती.

विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कुमार यांनी एचडी कुमारस्वामी सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाच्या आधीच 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला होता. या घडामोडीनंतर राज्यात भाजपचे सरकार आले होते.

गाडीसमोर अचानक आला वाघ आणि नागरिकांची बोबडीच वळली, VIDEO VIRAL

Published by: Akshay Shitole
First published: November 13, 2019, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading