कठीण काळात सैनिकानं पळ काढणं हा पळपुटेपणा- सर्वोच्च न्यायालय

कठीण काळात सैनिकानं पळ काढणं हा पळपुटेपणा- सर्वोच्च न्यायालय

संकटाच्या काळात सैनिकानं पळ काढणं ही कायरता असेल Supreme Courtनं म्हटलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै : सैनिकानं कठीण काळात देखील देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. कठीण काळात सैनिकानं पळ काढल्यास तो पळपुटेपणा असेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सेवेतून बडतर्फ केल्यानंतर सैनिकानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय दिला. न्यायमूर्ती एम. आर शाह आणि न्यायमूर्ती ए.एस बोपन्ना यांनी हा निर्णय दिला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सैनिकाला प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे अशा वेळी संकटांना पाठ दाखवत सैनिकानं पळ काढल्यास तो पळपुटेपणा ठरेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

2006मध्ये सैनिकांच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी सैनिकांनं दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी ठिकाणावरून पळ काढला. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आणि त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून बंदूक घेऊन पसार झाले. त्यामुळे जवानावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. दरम्यान सैनिकावर कोर्ट मार्शन देखील झालं. सैन्यानं केलेल्या कारवाईला आव्हान देताना सैनिकांनं आपल्या वकिलाद्वारे त्याची सेवा उत्तम होती. शिवाय, कोणत्याही वेळी त्यानं माघार घेतली नसल्याचे पुरावे सादर केले. सेवेतून बडतर्फ केल्यानंतर सैनिकानं चंडीगढ न्यायालयामध्ये 2011मध्ये कोर्ट मार्शलच्या निर्णयाला आव्हान दिलं. पण, न्यायालयानं कोर्ट मार्शलचा आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देखील सैनिकानं केलेली याचिका फेटाळून लावत कठीण काळात सैनिकानं पळ काढल्यास तो पळपुटेपणा असेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. याचिकाकर्ता सैनिक 2006मध्ये 3 राष्ट्रीय रायफल बटालियनमध्ये कार्यरत होता.

SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 11:39 AM IST

ताज्या बातम्या